Abhishek Sharma : अभिषेक शर्मानं वानखेडेवर षटकारांचा पाऊस पाडला, एकाच सामन्यात केले हे ८ महापराक्रम
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Abhishek Sharma : अभिषेक शर्मानं वानखेडेवर षटकारांचा पाऊस पाडला, एकाच सामन्यात केले हे ८ महापराक्रम

Abhishek Sharma : अभिषेक शर्मानं वानखेडेवर षटकारांचा पाऊस पाडला, एकाच सामन्यात केले हे ८ महापराक्रम

Feb 02, 2025 09:12 PM IST

Abhishek Sharma Century : इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या ३७ चेंडूत शतक झळकावून उडवून दिली. इंग्लंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमधील कोणत्याही फलंदाजाचे हे सर्वात जलद शतक आहे.

Abhishek Sharma : अभिषेक शर्मानं वानखेडेवर षटकारांचा पाऊस पाडला, एकाच सामन्यात केले हे ८ महापराक्रम
Abhishek Sharma : अभिषेक शर्मानं वानखेडेवर षटकारांचा पाऊस पाडला, एकाच सामन्यात केले हे ८ महापराक्रम (Surjeet Yadav)

Abhishek Sharma Records : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आपल्या तुफानी फलंदाजीने खळबळ उडवून दिली. अभिषेक शर्माने दमदार फलंदाजी करत टीम इंडियासाठी अवघ्या ३७ चेंडूत शतक पूर्ण केले.

यासोबतच अभिषेकने टी-२० फॉरमॅटमध्ये अप्रतिम कामगिरी करत अर्धा डझनहून अधिक विक्रम मोडीत काढले. अशा परिस्थितीत या डावात केलेल्या विक्रमांबद्दल जाणून घेऊया.

इंग्लंडविरुद्ध सर्वात वेगवान टी-20 शतक

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने दमदार कामगिरी करत अवघ्या ३७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अभिषेक शर्माने टी-20 फॉरमॅटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. अभिषेकपूर्वी ख्रिस गेल आणि ॲरॉन फिंच यांनी असा विक्रम केला होता.

भारतासाठी दुसरं सर्वात जलद टी-20 शतक

इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करतानाच अभिषेक शर्माने टीम इंडियासाठी दुसरे सर्वात वेगवान टी20 शतक झळकावण्याचा पराक्रमही केला आहे. अभिषेकने केवळ ३७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. टीम इंडियासाठी T20 मध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने अवघ्या ३५ चेंडूत शतक झळकावले होते. तर संजू सॅमसन याने ४० चेंडूत शतक ठोकले होते.

अभिषेकने क्विंटन डी कॉकला मागे टाकले

इंग्लंडविरुद्ध शानदार फलंदाजी करताना अभिषेक शर्माने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्विंटन डी कॉकला मागे टाकले. अभिषेकने टी-20 सामन्यात १०.१ षटकात आपले शतक पूर्ण केले. यापूर्वी डी कॉकने २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १०.२ षटकांत शतक झळकावले होते.

पॉवर प्लेमध्ये अभिषेक शर्माचे अर्धशतक

आपले शतक झळकावण्यापूर्वी अभिषेक शर्माने अवघ्या १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. टीम इंडियासाठी टी-20 मधील हे दुसरे सर्वात वेगवान टी-20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठरले. अभिषेकने पॉवरप्लेमध्येच आपले अर्धशतक पूर्ण केले. पॉवर प्लेमध्ये अर्धशतक ठोकण्याच्या बाबतीत अभिषेक संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. या बाबतीत रोहित शर्माचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. रोहितने पॉवर प्लेमध्ये दोन अर्धशतके झळकावली आहेत.

पॉवर प्लेमध्ये टीम इंडियाची सर्वात मोठी धावसंख्या

अभिषेक शर्माच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने पॉवर प्लेमध्ये आपल्या सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केला. मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध पॉवर प्लेमध्ये १ गडी गमावून ९५ धावा केल्या. यापूर्वी भारताने पॉवर प्लेमध्ये ८२ धावा केल्या होत्या.

अभिषेक शर्मा टी-20 चा नवा सिक्सर किंग

इंग्लंडविरुद्धच्या या टी-20 सामन्यात टीम इंडियाकडून अभिषेक शर्माने १३५ धावांची इनिंग खेळली. अभिषेकने या डावात एकूण १३ षटकार ठोकले. यासह अभिषेकने टीम इंडियासाठी एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला.

T20 मध्ये टीम इंडियासाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर आहे. टीम इंडियासाठी अभिषेकने मॅचमध्ये १३५ रन्सची इनिंग खेळली. अभिषेकने ५४ चेंडूंचा सामना करत १३ षटकार आणि ७ चौकार मारले.

अभिषेक शर्माचे T20 मधील दुसरे शतक

अभिषेक शर्माने टी-20 क्रिकेटमधील दुसरे शतक झळकावले. यासह त्याने तिलक वर्मा आणि केएल राहुलची बरोबरी केली आहे. या फॉरमॅटमध्ये भारतासाठी रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक शतके आहेत. रोहितने ५ शतके झळकावली आहेत. तर सूर्याची ४ शतके आणि संजू सॅमसनची ३ शतके आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या