भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला जात आहे. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडने भारताला १९२ धावांचे लक्ष्य दिले आहे. आज (२५ फेब्रुवारी) सामन्याचा तिसरा दिवस आहे.
इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर आटोपला. भारताकडून आर. अश्विनने ५ आणि कुलदीप यादवने ४ विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३५३ धावा केल्या. यानंतर भारताने पहिल्या डावात ३०७ धावा केल्या. अशा प्रकारे इंग्लंडला पहिल्या डावाच्या आधारे ४६ धावांची आघाडी मिळाली होती. पण दुसऱ्या डावात इंग्लंडला या आघाडीचा फारस फायदा घेता आला नाही. इंग्लंडचा दुसरा डाव केवळ दोन सत्रात अवघ्या १४५ धावात आटोपला. अशा प्रकारे आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता.तर त्यानंतर दोन सामने भारताने जिंकले. भारत सध्या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडला हा सामना जिंकणे अवश्यक आहे. तर हा सामना जिंकून मालिका जिंकण्याची टीम इंडियाला संधी आहे.
दुसऱ्या डावात इंग्लंडकडून फक्त जॅक क्रॉलीनेच थोडाफार संघर्ष केला. क्रॉलीने ६० धावांची खेळी केली. क्रॉलीशिवाय जॉनी बेअरस्टोने ३० धावांची खेळी खेळली. तरर ऑली पोप, जो रूट आणि बेन स्टोक्स हे महत्वाचे फलंदाज स्वस्तात बाद झाले.
भारताकडून आर. अश्विनने ५ आणि कुलदीप यादवने ४ विकेट घेतल्या. अश्विनने ३५व्यांदा एका कसोटी डावात ५ बळी घेतले. रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली.