India vs England Pune T20 Scorecard : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना पुण्यात खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा १५ धावांनी पराभव केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने १८१ धावा केल्या होत्या. यादरम्यान शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याने अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ सर्वबाद १६६ धावाच करू शकला. त्यासाठी हॅरी ब्रूकने अर्धशतक झळकावले. या मालिकेत भारताने ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
भारताकडून हर्षित राणा आणि रवी बिश्नोईने ३-३ बळी घेतले. वरुण चक्रवर्तीला दोन बळी मिळाले. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
इंग्लंडची नववी विकेट पडली. हर्षित राणाने जेमी ओव्हरटनला बाद केले. तो १९ धावा करून बाद झाला.
भारताला विजयासाठी एका विकेटची गरज आहे. इंग्लंडला विजयासाठी ६ चेंडूत १९ धावांची गरज आहे.
इंग्लंडची सातवी विकेट बेथेलच्या रूपाने पडली. हर्षित राणाने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इंग्लंड बॅकफूटवर आहे. संघाने १६ षटकांत ७ गडी गमावून १३७ धावा केल्या आहेत. ओव्हरटन १ धाव करून खेळत आहे. जोफ्रा आर्चरला अद्याप खाते उघडता आलेले नाही.
इंग्लंडने १० षटकांत ३ गडी गमावून ८६ धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी ९६ धावांची गरज आहे.
लिव्हिंगस्टन ८ धावा करून खेळत आहे. हॅरी ब्रूक १२ धावा करून खेळत आहे.
इंग्लंडची तिसरी विकेट जॉस बटलरच्या रूपाने पडली. तो अवघ्या २ धावा करून बाद झाला. रवी बिश्नोईने बटलरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
इंग्लंडने ७.३ षटकात ३ गडी गमावून ६७ धावा केल्या आहेत.
इंग्लंडची पहिली विकेट बेन डकेटच्या रूपाने पडली. रवी बिश्नोईने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. डकेट १९ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला.
इंग्लंडचा आकडा ५० धावांच्या पुढे गेला आहे. डकेट आणि सॉल्ट यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. टीम इंडियाने ५ षटकात ५३ धावा केल्या आहेत. डकेट ३७ धावा करून खेळत आहे. सॉल्ट १५ धावा करून क्रीजवर आहे. टीम इंडिया विकेटच्या शोधात आहे.
भारताने इंग्लंडला विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताने २० षटकांत ९ गडी गमावून १८१ धावा केल्या आहेत. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी टीम इंडियासाठी स्फोटक अर्धशतकं झळकावली आहेत.
शिवम दुबेने ३४ चेंडूंचा सामना करत ५३ धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. पंड्यानेही ५३ धावांची खेळी खेळली. रिंकू सिंगने ३० धावा केल्या. अभिषेक शर्मा २९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
इंग्लंडकडून साकिब महमूदने ३ बळी घेतले. जेमी ओव्हरटनने २ बळी घेतले. तर आदिल रशीद आणि ब्रेडन कार्स यांना १-१ विकेट मिळाली.
शिवम दुबेने दमदार कामगिरी करत अर्धशतक झळकावले. तो ३१ चेंडूत ५२ धावा करून खेळत आहे. दुबेने ७ चौकार आणि २ षटकार मारले आहेत. अक्षर पटेल ३ धावा करून खेळत आहे.
भारताने १९ षटकांत ६ गडी गमावून १७८ धावा केल्या आहेत.
हार्दिक पांड्याने स्फोटक फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले आहे. २७ चेंडूत ५० धावा करून खेळत आहे. पांड्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले आहेत.
भारताने 17.1 षटकात 158 धावा केल्या आहेत.
शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांच्यातील अर्धशतकी भागीदारी भारतासाठी पूर्ण झाली आहे. पांड्या २८ तर दुबे ३३ धावा करत खेळत आहे.
भारताने १६ षटकात ५ गडी गमावून १२९ धावा केल्या आहेत.
भारताची पाचवी विकेट रिंकू सिंगच्या रूपाने पडली. २६ चेंडूत ३० धावा करून तो बाद झाला. कार्सने रिंकूला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इंग्लंडने भारताच्या अडचणी वाढवल्या आहेत.
टीम इंडियाने ११ षटकात ५ विकेट गमावून ७९ धावा केल्या आहेत. शिवम दुबे १३ धावा करून खेळत आहे. हार्दिक पांड्याला अद्याप खाते उघडता आलेले नाही.
भारताच्या १० षटकात ४ बाद ७२ धावा झाल्या आहेत. सध्या रिंकू सिंग आणि शिवम दुबे क्रीजवर आहेत. रिंकू २९ तर शिवम दुबे १० धावांवर खेळत आहेत.
भारताची चौथी विकेट अभिषेक शर्माच्या रूपाने पडली. १९ चेंडूत २९ धावा करून तो बाद झाला. त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारला. आदिल रशीदने अभिषेकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
पॉवरप्लेनंतर टीम इंडियाची धावसंख्या ३ विकेटवर ४७ धावा आहे. अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंग यांच्यात चौथ्या विकेटसाठी २४ चेंडूत ३५ धावांची भागीदारी झाली. त्याचबरोबर इंग्लंडकडून आतापर्यंत साकिब महमूदने २ बळी घेतले आहेत.
एकाच षटकात तीन फलंदाज बाद झाले. संजूनंतर तिलक वर्मा शून्यावर बाद झाला. साकिब महमूदनेही टिळकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
यानंतर सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाला. साकिब महमूदनेच त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
भारताला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर संजू सॅमसन अवघ्या १ धाव करून बाद झाला. साकिब महमूदने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
भारताने १.१ षटकात एक विकेट गमावून १२ धावा केल्या आहेत.
भारताने चांगली सुरुवात केली आहे. अभिषेक शर्माने पहिल्याच षटकात एक षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने १० धावा केल्या आहेत. संजू सॅमसन १ धाव करून खेळत आहे.
टीम इंडियाने पहिल्या षटकात १२ धावा केल्या आहेत.
भारताची प्लेइंग इलेव्हन: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की, टीम इंडियाने तीन बदलांसह या सामन्यात उतरणार आहे. मोहम्मद शमीच्या जागी अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेलच्या जागी रिंकू सिंगला संधी मिळाली आहे तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शिवम दुबेला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आले आहे.
पुण्यातील टी-२० सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आहे. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.
पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले होते. मात्र यानंतर इंग्लंडनेजबरदस्त पुनरागमन केले. राजकोटमध्ये खेळलेला सामना २६ धावांनी जिंकला. या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी काही खास नव्हती.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज पुण्यात खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया विजयासह मालिकेत अजेय आघाडी घेण्याच्या उद्देशाने उतरली आहे. या मालिकेत भारत सध्या २-१ ने आघाडीवर आहे.
संबंधित बातम्या