भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज अहमदाबाद येथे खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाने ही तीन सामन्यांची मालिका आधीच जिंकली आहे. आता हा सामना जिंकून एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा सफाया करणे हे टीम इंडियाचे लक्ष्य आहे.
मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ४ गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर कटक वनडेतही रोहित ब्रिगेडने ब्रिटीशांचा ४ गडी राखून पराभव केला. कटकमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. रोहित ११९ धावांची तुफानी इनिंग खेळून फॉर्ममध्ये परतला.
या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर वरुण चक्रवर्ती पिंढरीच्या दुखापतीमुळे बाहेर आहे.
कुलदीप, वॉशिंग्टन आणि अर्शदीप यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, इंग्लंडने जेमी ओव्हरटनच्या जागी टॉम बँटन याचा संघात समावेश केला.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंग.
इंग्लंड : बेन डकेट, फिल सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, टॉम बँटन, गस ऍटकिन्सन, मार्क वुड, आदिल रशीद, साकिब महमूद.
संबंधित बातम्या