IND vs ENG Test : सरफराज खानची टीम इंडियात एन्ट्री, केएल राहुल-जडेजा दुसऱ्या कसोटीतून बाहेर
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG Test : सरफराज खानची टीम इंडियात एन्ट्री, केएल राहुल-जडेजा दुसऱ्या कसोटीतून बाहेर

IND vs ENG Test : सरफराज खानची टीम इंडियात एन्ट्री, केएल राहुल-जडेजा दुसऱ्या कसोटीतून बाहेर

Jan 29, 2024 05:21 PM IST

ind vs eng 2nd test : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला दुहेरी धक्का बसला आहे. भारतीय संघाचे दोन स्टार खेळाडू दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत.

KL Rahul And Ravindra Jadeja Ruled Out 2nd Test
KL Rahul And Ravindra Jadeja Ruled Out 2nd Test

KL Rahul And Ravindra Jadeja Ruled Out 2nd Test : टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. हैदराबाद कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाला दुहेरी धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जेडजा आणि मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुल दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत.बीसीसीआयने ही माहिती दिली आहे.

दुसरी कसोटी २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळली जाणार आहे. दरम्यान, हैदराबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी जडेजाला दुखापत झाली होती, तर केएल राहुलने उजव्या क्वाड्रिसेप्स दुखत असल्याची तक्रार केली होती. आता, बीसीसीआयचे वैद्यकीय पथक या दोन्ही खेळाडूंवर लक्ष ठेवून आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश केला आहे. तर, आवेश खान आपली रणजी टी मध्य प्रदेशसोबत राहणार असून गरज पडेल तेव्हाच तो टीम इंडियामध्ये सामील होईल.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश. कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.

Whats_app_banner