मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG Test : भारत-इंग्लंड कसोटी किती वाजता सुरू होणार? कोणत्या चॅनेल-अ‍ॅपवर दिसणार सामना

IND vs ENG Test : भारत-इंग्लंड कसोटी किती वाजता सुरू होणार? कोणत्या चॅनेल-अ‍ॅपवर दिसणार सामना

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 23, 2024 09:38 PM IST

Ind vs Eng 1st Test Live Streaming : भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे.

ind vs eng 1st test
ind vs eng 1st test (REUTERS)

भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ जबरदस्त तयारी करत आहेत. 

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची अलीकडच्या काळातील कामगिरी खूपच चांगलीच झाली आहे. तर बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड १२ वर्षांपासून भारतात कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. यामुळे हा १२ वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने इंग्लंड मैदानात उतरणार आहे.

हैदराबादची खेळपट्टी कशी आहे?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हैदराबादच्या या मैदानावर फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. या मैदानावर धावा करणे खूप सोपे आहे कारण चेंडू बॅटवर चांगला येतो. खेळपट्टीत चांगली उसळी असल्याने सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळते.

राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमची आकडेवारी

हैदराबादमधील या मैदानावर आतापर्यंत एकूण ५ कसोटी सामने झाले आहेत. यापैकी दोनमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली. त्याचबरोबर धावांचा पाठलाग करणार्‍या संघानेही दोन सामने जिंकले आहेत.

राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ४०४ धावा आहे, तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या ३७७ धावा आहे. तिसऱ्या डावात सरासरी स्कोअर २०५ आणि चौथ्या डावात १३१ धावा आहे. म्हणजेच चौथ्या डावात या मैदानावर फलंदाजी करणे थोडे कठीण आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी कधी होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना २५ ते २९ जानेवारी दरम्यान खेळवला जाईल.

भारत- इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना कुठे होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

भारत- इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याची वेळ काय?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सकाळी ९.३० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक अर्धा तास आधी होईल.

भारत-इंग्लंड कसोटी कोणत्या चॅनेल आणि अ‍ॅपवर दिसणार?

भारत-इंग्लंड कसोटी सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनल्सवर लाईव्ह पाहता येईल. तर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे जिओ सिनेमावर लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे.

 

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi