Kl Rahul : षटकाराच्या चेंडूवर केएल राहुल झेलबाद, बेन स्टोक्सला विश्वासच बसेना, पाहा-ind vs eng 1st test kl rahul missed century in india vs england hyaderabad test kl rahul wicket watch video ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Kl Rahul : षटकाराच्या चेंडूवर केएल राहुल झेलबाद, बेन स्टोक्सला विश्वासच बसेना, पाहा

Kl Rahul : षटकाराच्या चेंडूवर केएल राहुल झेलबाद, बेन स्टोक्सला विश्वासच बसेना, पाहा

Jan 26, 2024 02:25 PM IST

Ind vs Eng 1st test : केएल राहुल याला शतक करण्याची संधी होती, पण त्याने ही सुवर्ण संधी आपल्याच चुकीने गमावली आहे. केएल राहुल १२३ चेंडूत ८६ धावा करून बाद झाला.

Ind vs Eng 1st test
Ind vs Eng 1st test (PTI)

Kl Rahul Missed Century, Hyaderabad Test :  भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. आज (२६ जानेवारी) सामन्याचा दुसरा असून टीम इंडिया फलंदाजी करत आहे.

या सामन्यात टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुल याला शतक करण्याची संधी होती, पण त्याने ही सुवर्ण संधी आपल्याच चुकीने गमावली आहे. केएल राहुल १२३ चेंडूत ८६ धावा करून बाद झाला.

केएल राहुल शॉर्ट बॉलवर झेलबाद झाला

केएल राहुल एका शॉर्ट बॉलवर झेलबाद झाला. पदार्पणाचा सामना खेळणारा फिरकीपटू टॉम हार्टलेने राहुलला शॉर्ट बॉल टाकला. या चेंडूवर राहुलला आरामात षटकार मारण्याची संधी होती. त्याने मागच्या पायावर जाऊन षटकारासाठी मोठा फटकाही खेळला, पण चेंडू बॅटवर नीट बसला नाही आणि डीप मिडविकेटवर रेहान अहमदने त्याचा झेल घेतला.

राहुलच्या बॅटमधून ८६ धावांची शानदार खेळी आली. १२३ चेंडूंच्या खेळीत त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले. तो या सामन्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज ठरला आहे.

केएल राहुलने घेतला जीवदानाचा फायदा

विशेष म्हणजे, केएल राहुल फलंदाजीला आल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर त्याला जीवदान मिळाले. जो रूटच्या गोलंदाजीवर विकेटकीपर बेन फॉक्सने त्याचा झेल सोडला. यावेळी राहुलने पळून धावा काढल्या. चेंडू राहुलच्या बॅटला लागला होता. पण अंपायरने या धावा बायच्या रुपात दिल्या. म्हणजेच फोक्सने झेल जरी घेतला असता तरी राहुल बाद झाला नसता. कारण इंग्लंडकडे डीआरएस शिल्लक नव्हता.

तत्पूर्वी, या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा संघ २४६ धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघ फलंदाजी करत असून कसोटीवर मजबूत पकड निर्माण केली आहे.