India vs England 1st T20 : टीम इंडिया आज या वर्षातील पहिला टी-20 सामना खेळणार आहे. भारतासमोर इंग्लंडचे आव्हान आहे. दोन्ही संघ कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भिडतील. भारत-इंग्लंड टी-20 सामन्याची नाणेफेक संध्याकाळी ६.३० वाजता होईल. तर सामना ७ वाजता सुरू होईल.
हा सामना तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर टीव्हीवर पाहता येणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग मोबाईलवर हॉटस्टारवर उपलब्ध असेल.
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण २४ टी-20 सामने खेळले गेले आहेत. या दरम्यान भारताने १३ वेळा विजय मिळवला आहे. इंग्लंडने ११ वेळा विजय मिळवला आहे. मात्र, ईडन गार्डन्सच्या मैदानावर भारताला आतापर्यंत इंग्लंडला हरवता आलेले नाही. या मैदानावर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत दोन सामने झाले असून, दोन्ही वेळा इंग्लंडने विजय मिळवला आहे.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी योग्य आहे, परंतु अनेक वेळा येथे मोठी धावसंख्याही पाहायला मिळाली आहे. खेळपट्टी पाहता टीम इंडिया तीन फिरकीपटूंसोबत जाऊ शकते. इंग्लंडने आधीच आपले प्लेइंग इलेव्हन जाहीर केले आहे. ते ४ वेगवान गोलंदाज आणि एक मुख्य फिरकीपटू घेऊन खेळणार आहेत.
या सामन्यात नाणेफेक मोठी भूमिका बजावणार आहे. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला विजयाची अधिक शक्यता असते. दोन्ही संघातील हा सामना चुरशीचा होणार आहे.
इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन - बेन डकेट, फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वुड.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि मोहम्मद शमी.
संबंधित बातम्या