Mohammed Shami : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये शमी का खेळला नाही? कर्णधार सूर्याने सांगितलं कारण
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mohammed Shami : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये शमी का खेळला नाही? कर्णधार सूर्याने सांगितलं कारण

Mohammed Shami : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये शमी का खेळला नाही? कर्णधार सूर्याने सांगितलं कारण

Jan 23, 2025 11:04 AM IST

मोहम्मद शमी पहिल्या टी-20 सामन्यात का खेळला नाही? तो अद्याप फिट झाला नाही का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, आता कर्णधार सूर्यकुमार यादवने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे

Mohammed Shami : कोलकाता टी-20 मध्ये शमी का खेळला नाही? कर्णधार सूर्याने सांगितलं कारण
Mohammed Shami : कोलकाता टी-20 मध्ये शमी का खेळला नाही? कर्णधार सूर्याने सांगितलं कारण (Bibhash Lodh)

भारत आणि इंग्लंड यांच्यात कोलकाता येथे पहिला टी-20 सामना खेळला गेला. इंग्लंडविरुद्धच्या या पहिल्या टी20 सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गोलंदाजीला येईल, असे चाहत्यांना वाटले.

पण प्लेइंग इलेव्हनमध्ये शमीचा समावेश नव्हता. ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेला हा सामना टीम इंडियाने ७ गडी राखून जिंकला. पण वेगवान गोलंदाजांसाठी नंदवनन मानल्या जाणाऱ्या ईडन गार्डन्सवर भारताने तीन फिरकीपटूंना संधी दिली. मोहम्मद शमीला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले.

अशा स्थितीत मोहम्मद शमी पहिल्या टी-20 सामन्यात का खेळला नाही? तो अद्याप फिट झाला नाही का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, आता कर्णधार सूर्यकुमार यादवने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

चाहते शमीची वाट पाहत होते

भारतीय क्रिकेट चाहते मोहम्मद शमीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाची वाट पाहत होते. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने शेवटचा सामना खेळला होता. त्यावेळी त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती आणि नंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.

शस्त्रक्रियेनंतर त्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्न उपस्थित झाले होते, परंतु ऑक्टोबर २०२४ मध्ये तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला. त्याने बंगालसाठी सर्व फॉरमॅट खेळून आपली तंदुरुस्ती सिद्ध केली आणि त्यानंतर निवडकर्त्यांनी त्याचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात समावेश केला. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या T20I मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला होता.

यानंतर कोलकात्यातील पहिल्या टी-20 मध्ये तो खेळेल, अशी अपेक्षा होती. त्याने दोनच दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, सामन्याच्या दिवशी शमीला बेंचवर बसवण्यात आले आणि भारताने वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई या तीन फिरकी गोलंदाजांची निवड केली. मात्र, यानंतर काही लोकांनी खेळण्याबाबत शमीच्या फिटनेसबद्दल चिंता व्यक्त केली, मात्र सूर्यकुमारने त्याला स्पष्ट उत्तर दिले.

शमीबाबत सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

शमीच्या प्रश्नावर कर्णधार सूर्याने सांगितले, की आम्हाला आमच्या ताकदीवर टिकून राहायचे आहे. दक्षिण आफ्रिकेतही आम्ही हीच रणनीती अवलंबली होती. हार्दिकने नवीन चेंडूसह गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारली, ज्यामुळे मला प्लेइंग इलेव्हनमध्ये अतिरिक्त फिरकीपटूंचा समावेश करता आला.

हे तिन्ही फिरकीपटू चमकदार कामगिरी करत होते. या विधानावरून शमीला बाहेर ठेवण्याचा निर्णय हा फिटनेसशी संबंधित नसून ती धोरणात्मक चाल होती, हे स्पष्ट झाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या