Ind vs Eng : ईडन गार्डन्सवर भारताचा धमाका, १२ षटकात इंग्लंडला हरवलं, अभिषेक शर्माच्या ३४ चेंडूत ७९ धावा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Eng : ईडन गार्डन्सवर भारताचा धमाका, १२ षटकात इंग्लंडला हरवलं, अभिषेक शर्माच्या ३४ चेंडूत ७९ धावा

Ind vs Eng : ईडन गार्डन्सवर भारताचा धमाका, १२ षटकात इंग्लंडला हरवलं, अभिषेक शर्माच्या ३४ चेंडूत ७९ धावा

Jan 22, 2025 10:01 PM IST

Ind vs Eng 1st T20 Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात भारताने धमाकेदार विजय मिळवला.

india vs england 1st 20 highlight : Ind vs Eng : ईडन गार्डन्सवर भारताचा धमाका, १२ षटकात इंग्लंडला हरवलं, अभिषेक शर्माच्या ३४  चेंडूत ७९ धावा
india vs england 1st 20 highlight : Ind vs Eng : ईडन गार्डन्सवर भारताचा धमाका, १२ षटकात इंग्लंडला हरवलं, अभिषेक शर्माच्या ३४ चेंडूत ७९ धावा

India vs England 1st 20 Highlights : भारत-इंग्लंड मालिकेला आजपासून (२२ जानेवारी) दणक्यात सुरुवात झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने धमाकेदार विजय मिळवला.

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकात १३२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने १२.५ षटकात ३ बाद १३३ धावा करून सामना जिंकला. इंग्लंडविरुद्धच्या या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

तत्पूर्वी, इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामीला आले. यादरम्यान सॅमसन २६ धावा करून बाद झाला. २० चेंडूंचा सामना करताना त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. कर्णधार सूर्यकुमार यादवला खातेही उघडता आले नाही. त्याला जोफ्रा आर्चरने शून्यावर बाद केले. 

यानंतर अभिषेकने शानदार कामगिरी करत ७९ धावांची खेळी केली. टिळक वर्मा १९ धावा करून नाबाद राहिला. हार्दिक पंड्या ३ धावा करून नाबाद राहिला. भारताने हे लक्ष्य १२.५ षटकांत पूर्ण केले.

अभिषेकने धमाकेदार अर्धशतक झळकावले 

भारताकडून अभिषेक शर्माने मॅच विनिंग इनिंग खेळली. त्याने अवघ्या २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अभिषेकने ३४ चेंडूंचा सामना करत ७९ धावा केल्या. त्याने ५ चौकार आणि ८ षटकार मारले.

इंग्लंडकडून सर्वोच्च धावसंख्या कर्णधार जोस बटलरने केली, ज्याने ४४ चेंडूत ६८ धावा केल्या. टीम इंडियाकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ३ बळी घेतले. अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी २ गडी बाद केले.

इंग्लंडचा डाव

या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय प्रभावी ठरला कारण इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर (फिल सॉल्ट आणि बेन डकेट) १७ धावांत पॅव्हेलियनमध्ये परतले.

पण कर्णधार जोस बटलरने हार मानली नाही आणि ६८ धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. शेवटच्या षटकांमध्ये आदिल रशीद आणि जोफ्रा आर्चर यांनी मिळून २१ धावा करत इंग्लंडची धावसंख्या १३० धावांच्या पुढे नेली. इंग्लंडचे इतर फलंदाज फ्लॉप ठरले.

भारताची घातक गोलंदाजी

भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव आणला. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला शून्यावर बाद केले आणि त्याच्या स्पेलच्या पुढच्या षटकात बेन डकेटलाही बाद केले. इंग्लंड संघाची अवस्था इतकी वाईट होती की त्यांनी १०० धावांतच ६ विकेट गमावल्या होत्या.

जॉस बटलर, हॅरी ब्रूक आणि जोफ्रा आर्चर वगळता इंग्लंडचे उर्वरित ८ फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत.

जॉस बटलरने ८ चौकार आणि २ षटकार मारत ६८ धावा केल्या.  त्याने भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये ५०० धावांचा टप्पा पार केला आहे. टीम इंडियाविरुद्ध टी-20 सामन्यातील त्याची ही पाचवी अर्धशतकी खेळी होती. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या