IND Vs CAN Updates : टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये आज (१५ जून) टीम इंडिया आणि कॅनडा यांच्यातील सामना खराब आउटफिल्डमुळे रद्द करण्यात आला आहे. उभय संघांमधील हा सामना फ्लोरिडा येथील लॉडरहिल सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क टर्फ मैदानावर खेळवला जाणार होता.
फ्लोरिडामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. याच कारणामुळे श्रीलंका आणि नेपाळ यांच्यातील सामना नाणेफेकीच्या आधीच रद्द करण्यात आला. यानंतर, खराब आऊटफिल्ड आणि पावसामुळे शुक्रवारी अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामनाही होऊ शकली नाही.
आता भारत-कॅनडा सामनादेखील रद्द करावा लागला आहे. सुमारे दीड तास सामना सुरू होण्याची प्रतीक्षा करण्यात आली, मात्र त्यानंतर नाणेफेक होण्याआधीच सामना रद्द झाल्याचे घोषित करण्यात आले.
टर्फ मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी सुमारे दीड तास प्रतीक्षा करण्यात आली, मात्र आऊटफील्ड सामना खेळवण्याच्या स्थितीत नव्हती. अशा स्थितीत पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. येथे काल यूएसए आणि आयर्लंड यांच्यातील सामनाही नाणेफेक न होता रद्द करण्यात आला.
टीम इंडियाला सुपर ८ मध्ये ३ सामने खेळायचे आहेत. भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. हा सामना २० जून रोजी होणार आहे. यानंतर भारत आणि ड गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ यांच्यात सामना होईल. हा सामना २२ जून रोजी होणार आहे. टीम इंडिया २४ जूनला ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. हा भारताचा शेवटचा सुपर ८ सामना असेल.
सुपर ८ चे सामने १९ जूनपासून सुरू होतील. पहिला सामना अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आहे. सुपर ८ चा शेवटचा सामना २४ जून रोजी होणार आहे. हा सामना अफगाणिस्तान आणि डी-2 यांच्यात होणार आहे. यानंतर २६ जून रोजी पहिला उपांत्य सामना खेळवला जाईल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना २७ जून रोजी होणार आहे. २९ जून रोजी अंतिम सामना होणार आहे. हा सामना बार्बाडोसमध्ये होणार आहे.
सध्या फ्लोरिडामध्ये पाऊस पडत नाहीये. पण खराब आऊटफिल्डमुळे भारत आणि कॅनडा सामन्याचा नाणेफेक अद्याप होऊ शकला नाही. दरम्यान, भारतीय वेळेनुसार रात्री ११.४५ पर्यंत ५-५ षटकांचा सामना होऊ शकतो.
पंच रिचर्ड केटलबरो आणि शराफुद्दौला यांनी मैदानाची पाहणी केली. मात्र, अजूनही अनेक ठिकाणी पाणी साचले असून, मैदान ओले आहे. अशा स्थितीत सामना सुरू होण्यासाठी सध्या परिस्थिती योग्य नाही. आता भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजता पंच पुन्हा पाहणी करतील.
चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील सामन्याच्या नाणेफेकीला उशीर होणार आहे. सध्या पाऊस पडत नाही, पण खराब आउटफिल्डमुळे टॉसला उशीर होणार आहे. ताज्या अपडेटनुसार, आउटफिल्ड अजूनही ओलसर आहे, त्यामुळे टॉस वेळेवर होणार नाही.
कॅनडाविरुद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
संबंधित बातम्या