IND vs BAN: भारतीय क्रिकेट संघ जवळपास महिनाभराच्या विश्रांतीनंतर मैदानात उतरणार आहे. भारत उद्यापासून बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारताला पुढील १५ आठवड्याच्या कालावधीत एकूण १० कसोटी सामने खेळायचे आहेत. यामुळे पुढील काही महिने वेगवान गोलंदाजांसाठी आव्हानात्मक असतील. याच पार्श्वभूमीवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आपल्या संघातील सर्वोकृष्ट खेळाडूने प्रत्येक सामना खेळला पाहिजे, अशी अनेकांची इच्छा असते. पण, हे शक्य नसते.
रोहित शर्मा म्हणाला की, 'आपल्या संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंनी सर्व सामने खेळावेत, अशी तुमची इच्छा असते. पण ते शक्य नाही. भारताला आगामी १० कसोटी सामने खेळल्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिका खेळायची आहे. कोणता निर्णय संघासाठी फायदेचा ठरू शकतो आणि कोणत्या वेळी कुठल्या गोलंदाजाला विश्रांती द्यायची आहे, या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.'
भारतीय संघाच्या रणनीतीबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही काय योजना आखल्या आहेत, त्याबाबत आम्ही चर्चा देखील केली आहे. योजनेनुसार आम्ही पुढचा निर्णय घेऊ, जे आम्ही याआधीही केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आम्ही जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक- एक सामन्यात विश्रांती दिली होती. पंरतु, कोणत्या गोलंदाजाला कधी विश्रांती द्यायची आहे, हे सर्व गोलंदाजांच्या शरीरावर आणि फिजिओवर अवलंबून असते, असेही रोहित शर्मा म्हणाला. बुमराह, सिराज यांच्याशिवाय भारताकडे आकाश दीप आणि यश दयालसारखे गोलंदाज आहेत. याशिवाय, दुलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केलेल्या वेगवान गोलंदाजालाही भारतीय संघात जागा मिळाली आहे.
'दुलीप ट्रॉफीमध्ये काही वेगवान गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे गोलंदाज युनिटबाबत आम्हाला फारशी चिंता नाही. गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर ही पहिलीच कसोटी मालिका आहे. आम्ही एकमेकांना समजून घेतो', असेही रोहित शर्मा म्हणाला.
भारताच्या नव्या कोचिंग स्टाफबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, मी गौतम गंभीर आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना चांगला ओळखतो. मी मॉर्नी मॉर्केल आणि रायन टेन डेस्चेटविरुद्धही क्रिकेट खेळलो आहे. आताचे कोचिंग स्फाट आधीच्या कोचिंग स्टाफपेक्षा वेगळे असू शकते. यामुळे सुरुवातीला काही ऍडजस्टमेंट करावे लागतील. पण खेळाडू आणि प्रशिक्षक हे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
संबंधित बातम्या