मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs BAN Weather Report : भारत-बांगलादेश सराव सामन्यात पाऊस खलनायक ठरणार? असं असेल हवामान, जाणून घ्या

IND vs BAN Weather Report : भारत-बांगलादेश सराव सामन्यात पाऊस खलनायक ठरणार? असं असेल हवामान, जाणून घ्या

Jun 01, 2024 02:52 PM IST

ind vs ban warm up match weather report : भारत शनिवारी (१ जून) बांगलादेशविरुद्ध आपला एकमेव सराव सामना खेळणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

IND vs BAN Weather Report : भारत-बांगलादेश सराव सामन्यात पाऊस खलनायक ठरणार? असं असेल हवामान, जाणून घ्या
IND vs BAN Weather Report : भारत-बांगलादेश सराव सामन्यात पाऊस खलनायक ठरणार? असं असेल हवामान, जाणून घ्या

IND vs BAN, Pitch And Weather : टी-20 विश्वचषक २०२४ सुरु होण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. २ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. याआधी २७ जून ते १ जून या कालावधीत सराव सामने खेळवले जात आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

भारत शनिवारी (१ जून) बांगलादेशविरुद्ध आपला एकमेव सराव सामना खेळणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Nassau County International Cricket Stadium) रंगणार आहे.

टी-२० विश्वचषकातील हा शेवटचा सराव सामना असेल. या सराव सामन्यातून टीम इंडिया आपली प्लेइंग इलेव्हन निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. .

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामन्याआधी खेळपट्टी आणि हवामान अंदाजावर एक नजर टाकूया.

अमेरिकेतील काही सराव सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. पण सुदैवाने शनिवारी (१ जून) न्यूयॉर्कमध्ये पावासाचा अंदाज नाही. त्यामुळे सामना पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Accuweather नुसार, सामन्यादरम्यान कमाल तापमान २८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. खेळासाठी चांगली परिस्थिती निर्माण होईल.

आकाश जवळजवळ निरभ्र असेल, दिवसा ढगाळ असेल आणि रात्री अंशतः ढगाळ असेल आणि पावसाची शक्यता कमी असेल. पावसाने खेळात व्यत्यय येण्याची शक्यता खूपच कमी आहे, सकाळी पावसाची केवळ १ टक्के शक्यता आहे, जी रात्री ४ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. आर्द्रता पातळी ३६ टक्के ते ५४ टक्के राहील.

भारत वि. बांगलादेश पीच रिपोर्ट

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील खेळपट्टी अगदी नवीन आहे. नव्याने बांधलेल्या या स्टेडियममधील हा पहिलाच सामना असेल, त्यामुळे चाहत्यांना चांगल्या क्रिकेट सामन्याची अपेक्षा आहे. आजच्या सामन्यात फलंदाज आणि गोलंदाज दोघेही तितकेच महत्त्वाचे असतील.

दोन्ही संघ

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

बांगलादेश संघ : लिटन दास, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हृदया, शकीब अल हसन, महमुदुल्ला, जाकर अली (यष्टीरक्षक), महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, तनजीद हसन , तन्झीम हसन साकीब , तन्वीर इस्लाम.

टी-२० वर्ल्डकप २०२४