मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs BAN T20 Playing 11 : सुपर-८ मध्ये आज टीम इंडिया बांगलादेशला भिडणार, अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन

IND vs BAN T20 Playing 11 : सुपर-८ मध्ये आज टीम इंडिया बांगलादेशला भिडणार, अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन

Jun 22, 2024 08:02 AM IST

IND vs BAN T20 Playing 11 : टी-20 विश्वचषकात शनिवारी (२२ जून) टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यात भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, ते जाणून घेऊया.

IND vs BAN T20 Playing 11 : सुपर-८ मध्ये आज टीम इंडिया बांगलादेशला भिडणार, अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन
IND vs BAN T20 Playing 11 : सुपर-८ मध्ये आज टीम इंडिया बांगलादेशला भिडणार, अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन

india vs bangladesh t20 world cup 2024 : टी-20 विश्वचषक२०२४ मध्ये आज (२२ जून) भारत आणि बांगलादेश यांच्यात सुपर-८ फेरीचा सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजल्यापासून सुरू होईल. त्याआधी या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, ते जाणून घेऊया.

रोहित-विराटवर असेल नजर

जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर ८ टप्प्यातील पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली. उर्वरित दोन सामन्यांमध्ये फारसे अंतर नाही, त्यामुळे कर्णधार रोहित शर्माला आपले स्टार खेळाडू फॉर्ममध्ये परततील अशी आशा असेल. विराट कोहली आणि रोहित आजपर्यंत संघाला दमदार सुरुवात करून देऊ शकलेले नाहीत. या दोन फलंदाजांनी अद्याप एकही मोठी खेळी साकारलेली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

रोहित आणि कोहली या स्पर्धेत मोठी खेळी खेळण्यासाठी उत्सुक असतील आणि पुढील आव्हान लक्षात घेता भारतीय सलामी जोडीला फॉर्ममध्ये परतण्याची चांगली संधी असेल.

शिवम दुबेचा फॉर्म चिंतेचा विषय

डावखुरा फलंदाज शिवम दुबे याला मधल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये षटकार मारण्यासाठी संघात ठेवण्यात आले होते, परंतु आतापर्यंत तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. आयपीएलमधील ज्या फॉर्ममुळे त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले ते अद्याप दिसलेले नाही. अमेरिकेविरुद्धच्या गट सामन्यात त्याने नाबाद ३१ धावा केल्या, पण सूर्यकुमार यादवच्या प्रयत्नांमुळे भारताला विजय मिळवता आला.

तो पुन्हा अपयशी ठरला तर संघ व्यवस्थापन संजू सॅमसनला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेऊ शकते. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने बॅटिंग फॉर्ममध्ये परतणे आनंददायी होते. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला अफगाणिस्तानविरुद्ध पहिली संधी मिळाली आणि तो प्रभावी ठरला.

गोलंदाजीत बदल होणार नाही

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. ग्रुप स्टेजनंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर ८ सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत लक्ष्याचा बचाव करताना प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणण्यात यश मिळवले. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या देखील बुमराहला चांगली साथ देत आहेत, तर मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवनेही प्रभावित केले.

दोन्ही संंघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: विराट कोहली, रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.

बांगलादेश : तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हरदोय, झाकीर अली, शकीब अल हसन, महमुदुल्ला, लिटन दास (विकेटकीपर), तन्झिद हसन शाकिब, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान.

WhatsApp channel