IND vs BAN : भारत-बांगलादेश कसोटी कोणत्या चेंडूने खेळली जाणार? कुकाबुरा, एसजी आणि ड्यूक बॉलमध्ये काय फरक? जाणून घ्या-ind vs ban test series will play with sg ball know the difference between sg kookaburra and duke ball ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs BAN : भारत-बांगलादेश कसोटी कोणत्या चेंडूने खेळली जाणार? कुकाबुरा, एसजी आणि ड्यूक बॉलमध्ये काय फरक? जाणून घ्या

IND vs BAN : भारत-बांगलादेश कसोटी कोणत्या चेंडूने खेळली जाणार? कुकाबुरा, एसजी आणि ड्यूक बॉलमध्ये काय फरक? जाणून घ्या

Sep 13, 2024 05:47 PM IST

बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज लिटन दास याने एसजी चेंडूने खेळण्याबाबत चिंता व्यक्त केली होती. तो म्हणाला होता की, आम्हाला एसजी बॉलने खेळण्याची सवय नाही. अशा परिस्थितीत आमच्यासाठी हे आव्हान असेल. आम्ही एसजी बॉलने खेळण्याचा सराव करत आहोत.

IND vs BAN : भारत-बांगलादेश कसोटी कोणत्या चेंडूने खेळली जाणार? कुकाबुरा, एसजी आणि ड्यूक बॉलमध्ये काय फरक? जाणून घ्या
IND vs BAN : भारत-बांगलादेश कसोटी कोणत्या चेंडूने खेळली जाणार? कुकाबुरा, एसजी आणि ड्यूक बॉलमध्ये काय फरक? जाणून घ्या

पाकिस्तानला पाकिस्तानात धुळ चारल्यानंतर बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात २ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. भारतीय संघाने आजपासून चेन्नईत तयारी सुरू केली आहे.

मोठ्या उत्साहाने भारतात येणारा बांगलादेश संघ भारतीय गोलंदाजांपेक्षा चेंडूलाच जास्त घाबरलेला दिसत आहे. वास्तविक, भारतात कसोटी सामने एसजी बॉलने खेळले जातात. बांगलादेश संघाला कुकाबुरा चेंडूने खेळण्याची सवय आहे. पाकिस्तान दौऱ्यातही बांगलादेशने कुकाबुरा चेंडूने कसोटी मालिका जिंकली होती.

अलीकडेच बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज लिटन दास याने एसजी चेंडूने खेळण्याबाबत चिंता व्यक्त केली होती. तो म्हणाला होता की, आम्हाला एसजी बॉलने खेळण्याची सवय नाही. अशा परिस्थितीत आमच्यासाठी हे आव्हान असेल. आम्ही एसजी बॉलने खेळण्याचा सराव करत आहोत. 

अशा स्थितीत, कसोटी क्रिकेटमध्ये किती प्रकारचे बॉल वापरले जातात आणि एसजी बॉल, कुकाबुरा बॉल, ड्यूक बॉल यांच्यात काय फरक आहे, ते जाणून घेऊया. 

कुकाबुरा बॉल ऑस्ट्रेलियात बनवला जातो

टेस्ट क्रिकेटमध्ये एसजी बॉल, कुकाबुरा बॉलसोबतच ड्यूक बॉलचा वापर केला जातो. वेगवेगळे देश या चेंडूंनी आपापल्या पद्धतीने कसोटी क्रिकेट खेळतात. भारतात एसजी बॉलचा वापर केला जातो. हे फक्त भारतातच बनवले जाते.

झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका आणि पाकिस्तान हे देश कुकाबुरा वापरतात. कुकाबुराचे चेंडू ऑस्ट्रेलियात बनवले जातात. याशिवाय वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये ड्यूक बॉलने क्रिकेट खेळले जाते. इंग्लंडने ड्यूक बॉलची निर्मिती केली.

एसजी बॉल हाताने शिवलेला असतो

जर आपण एसजी आणि कुकाबुरामधील फरक पाहिला तर त्यांच्या शिलाईमध्ये फरक आहे.

एसजी बॉल हाताने शिवला जातो, तर कूकाबुरा बॉल मशीनने शिवला जातो.

हाताच्या शिलाईमुळे SG बॉलची सीम थोडी उंच असते. अशा परिस्थितीत, एसजी बॉलला अधिक सीम मुव्हमेंट मिळते. भारतीय वातावरणात स्विंग फक्त १०-२० षटकांसाठी उपलब्ध आहे. यानंतर चेंडू त्याची चमक गमावतो. भारतीय खेळपट्ट्या सामान्यतः खडबडीत असतात, म्हणून येथे एसजी चेंडू वापरला जातो.

एसजी बॉल बराच काळ आकार गमावत नाही. इतर चेंडूंच्या तुलनेत, एसजी बॉलमध्ये रिव्हर्स स्विंग देखील अधिक दिसून येते. याशिवाय, फिरकीपटूंना या चेंडूवर पकड बनवणे खूप सोपे आहे.

कुकाबुरा बॉल फिरकीपटूंसाठी अवघड

कुकाबुरा बॉलमध्ये सीम मुव्हमेंट फारशी दिसत नाही. कूकाबुरा चेंडू पहिल्या २० षटकांमध्ये चांगला स्विंग देतो. मात्र, त्यानंतर चेंडू फलंदाजांना मदत करू लागतो. कालांतराने त्याची शिलाई देखील वेगळी होऊ लागते. अशा स्थितीत फिरकीपटूंना चेंडू पकडण्यात अडचण येते. कुकाबूरा चेंडू उसळत्या खेळपट्ट्यांवर अधिक वापरला जातो.

ड्यूक बॉल गोलंदाजांना मदत करतो

ड्यूक बॉलबद्दल बोलायचे तर त्याची सीम उत्कृष्ट आहे. या चेंडूंची चमक ५०-५५ षटकांपर्यंत राहू शकते. तो मस्त स्विंग करतो. वेगवान गोलंदाजांसाठी ड्यूक बॉल हा सर्वात उपयुक्त चेंडू आहे.

Whats_app_banner