IND vs BAN : चेन्नईत रोहित, विराट-शुभमनचा फ्लॉप शो, नवख्या हसन महमुदनं स्वस्तात गुंडाळलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs BAN : चेन्नईत रोहित, विराट-शुभमनचा फ्लॉप शो, नवख्या हसन महमुदनं स्वस्तात गुंडाळलं

IND vs BAN : चेन्नईत रोहित, विराट-शुभमनचा फ्लॉप शो, नवख्या हसन महमुदनं स्वस्तात गुंडाळलं

Published Sep 19, 2024 11:20 AM IST

भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-११ मध्ये तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंचा समावेश केला आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीपचा वेगवान गोलंदाज म्हणून तर जडेजा आणि अश्विनचा फिरकी गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे.

IND vs BAN : चेन्नईत रोहित, विराट-शुभमनचा फ्लॉप शो, नवख्या हसन महमुदनं स्वस्तात गुंडाळलं
IND vs BAN : चेन्नईत रोहित, विराट-शुभमनचा फ्लॉप शो, नवख्या हसन महमुदनं स्वस्तात गुंडाळलं (PTI)

बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिमयवर आज (१९ सप्टेंबर) भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आला.

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-११ मध्ये तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंचा समावेश केला आहे.

जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीपचा वेगवान गोलंदाज म्हणून तर जडेजा आणि अश्विनचा फिरकी गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघ जेव्हा फलंदाजीसाठी क्रीझवर आला तेव्हा दिग्गज खेळाडू काही तरी खास करतील अशी सर्वांना अपेक्षा होती. कारण, टीम इंडिया मोठ्या ब्रेकनंतर मैदानावर परतली आहे. पण टीम इंडियाचे टॉप तीन फलंदाज स्वस्तात बाद झाले.

यात रोहित शर्माने ६ धावा केल्या तर, शुबमन गिल शुन्यावर बाद झाला. यानंतर विराट कोहलीही अतिशय वाईट फटका खेळून ६ धावा करून बाद झाला.

पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहित बांगलादेशचा वेगवान गोलंदाज हसन महमुदचा बळी ठरला.

वास्तविक १९४ दिवसांनंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या रोहितकडून बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी अपेक्षित होती, मात्र तो धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसला. पहिल्या डावात केवळ ६ धावा करून रोहित बाद झाला.

रोहित शर्मा हा भारताच्या फलंदाजीतील महत्त्वाचा दुवा आहे. रोहितला हसन महमूदने डावाच्या सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्लीपमध्ये झेलबाद केले.

विशेष म्हणजे याआधी रोहित एकदा हसन महमूदच्या गोलंदाजीवर पायचीत होण्यापासून वाचला होता.

यानंतर शुभमन गिल शुन्यावर बाद झाला. त्यालाही हसन महमुदने विकेटकीपर लिटन दासकरवी झेलबाद केले. शुभमन पहिल्या चेंडूपासूनच लयीत दिसत नव्हता. त्याने ६ चेंडूत ६ धावा केल्या. लेग स्टंपच्या बाहेरील चेंडूवर शुभमनने अतिशय वाईट फटका खेळला.

दोन विकेट लवकर पडल्यानंतर टीम इंडियाला विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण कोहलीली वाईट शॉट खेळून बाद झाला. त्यालाही हसन महमुदने विकेटकीपर लिटन दासकरवी झेलबाद केले. ऑफस्टंपच्या बाहेरील चेंडूवर विराटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅट लागून विकेटकीपरच्या हातात गेला.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारताची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन

शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.

Whats_app_banner

संबंधित बातम्या