IND vs BAN : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला जमलं नाही ते टीम इंडियानं केलं, कसोटीत अशी कामगिरी पहिल्यांदाच घडली, पाहा-ind vs ban test india makes fastest innings declaration record in test in the 21st century ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs BAN : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला जमलं नाही ते टीम इंडियानं केलं, कसोटीत अशी कामगिरी पहिल्यांदाच घडली, पाहा

IND vs BAN : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला जमलं नाही ते टीम इंडियानं केलं, कसोटीत अशी कामगिरी पहिल्यांदाच घडली, पाहा

Oct 01, 2024 01:14 PM IST

India vs Bangladesh Test : भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज पाचवा दिवस आहे. या सामन्यात भारताने मोठा विक्रम केला आहे.

IND vs BAN : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला जमलं नाही ते टीम इंडियानं केलं, कसोटीत अशी कामगिरी पहिल्यांदाच घडली, पाहा
IND vs BAN : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला जमलं नाही ते टीम इंडियानं केलं, कसोटीत अशी कामगिरी पहिल्यांदाच घडली, पाहा (PTI)

कानपूरमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. आज दुसऱ्या कसोटी सामन्याचा पाचवा दिवस (१ ऑक्टोबर) सुरू आहे. सामना संपण्यापूर्वी भारताने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तेही पहिल्या डावातच.

भारताने असा विक्रम केला आहे जो २१ व्या शतकात इतर कोणत्याही संघाला करता आला नाही. सर्वात कमी षटके खेळून कसोटी डाव घोषित करण्याचा विक्रम आहे.

कानपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात अप्रतिम आक्रमकता दाखवली. पावसामुळे दोन दिवसांचा खेळ गमावल्यानंतर भारताने चौथ्या दिवशी बांगलादेशला पहिल्या डावात २३३ धावांत गुंडाळले.

यानंतर वेळेची कमतरता लक्षात घेऊन कर्णधार रोहित शर्माने आक्रमक रणनीती अवलंबण्याचा निर्णय घेतला. त्याच्या संघाने हे काम खूप चांगल्या पद्धतीने केले आणि बांगलादेशच्या गोलंदाजांवर तुटून पडले, जे यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.

भारताने पहिल्या डावात केवळ ३४.४ षटकात २८५ धावा केल्या. यानंतर कर्णधाराने खेळाला एक दिवसापेक्षा जास्त वेळ शिल्लक असतानाही ५२ धावांची आघाडी घेऊन डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला.

२१ व्या शतकातील ही पहिलीच वेळ होती की एखाद्या संघाने ३५ षटकांपेक्षा कमी षटके खेळूडन पहिला डाव घोषित केला होता आणि गेल्या ७० वर्षात असे घडण्याची दुसरी वेळ होती.

भारताने कसोटीत सर्वात जलद २५० धावा केल्या

भारताने पहिल्या डावात सर्वात वेगवान ५०, १००, १५० आणि २०० धावांचा विक्रम मोडला. यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी डावाला चांगली सुरुवात करून दिली. त्यामुळे भारताने अवघ्या ३ षटकात ५० धावा पूर्ण केल्या आणि कसोटी इतिहासातील सर्वात जलद ५० धावांचा विक्रम केला.

यानंतर भारताने १०.१ षटकात १०० धावा पूर्ण केल्या आणि कसोटीत सर्वात जलद १०० धावांचा विक्रम केला. भारताने कसोटीत १८.२ षटकात सर्वात जलद १५० धावा करण्याचा विक्रमही केला. यानंतर २४.२ षटकात २०० धावा पूर्ण करून वेगाने २०० धावांचा विक्रम केला. ३०.१ षटकात २५० धावा पूर्ण करत भारताने कसोटीत सर्वात जलद २५० धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला.

Whats_app_banner