Ind vs Ban Super 8 : बांगलादेशला हलक्यात घेऊ नका, हे ५ खेळाडू टीम इंडियाला हरवू शकतात, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Ban Super 8 : बांगलादेशला हलक्यात घेऊ नका, हे ५ खेळाडू टीम इंडियाला हरवू शकतात, पाहा

Ind vs Ban Super 8 : बांगलादेशला हलक्यात घेऊ नका, हे ५ खेळाडू टीम इंडियाला हरवू शकतात, पाहा

Jun 21, 2024 09:05 PM IST

India vs Bangladesh Super 8 match : भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना नॉर्थ साऊंडमध्ये होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत करायचा आहे. पण बांगलादेशला हलके घेणे भारतासाठी धोक्याचे ठरू शकते.

Ind vs Ban Super 8 : बांगलादेशला हलक्यात घेऊ नका, हे ५ खेळाडू टीम इंडियाला हरवू शकतात, पाहा
Ind vs Ban Super 8 : बांगलादेशला हलक्यात घेऊ नका, हे ५ खेळाडू टीम इंडियाला हरवू शकतात, पाहा

भारतीय संघाने सुपर-८ मोहिमेची जोरदार सुरुवात केली आहे. भारताने अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव केला. पुढच्या सामन्यात टीम इंडियाचा सामना दुसऱ्या संघाशी होणार आहे. बांगलादेशचा संघ मोठ्या संघांना दणका देण्यासाठी ओळखला जातो. यापूर्वीही त्यांनी भारतीय संघाचा पराभव केला आहे. भारताला आपला पुढचा सामना शनिवारी (२२ जून) बांगलादेशविरुद्ध खेळायचा आहे.

हा सामना नॉर्थ साऊंडमध्ये होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत करायचा आहे. पण बांगलादेशला हलके घेणे भारतासाठी धोक्याचे ठरू शकते. या संघात असे खेळाडू आहेत जे भारतासाठी अडचणीचे ठरू शकतात. आपण येथे त्याच खेळाडूंबद्दल सांगणार आहोत.

मुस्तफिजुर रहमान

डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागतो. हे सर्वांना माहीत आहे. रोहित शर्मा हा अफगाणिस्तानविरुद्ध डावखुरा वेगवान गोलंदाज फजलहक फारुकीचा बळी ठरला. बांगलादेशकडेही डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. मुस्तफिजुर रहमान असे या गोलंदाजाचे नाव आहे. रहमान हा उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याच्याकडे स्विंग आणि सीम दोन्ही आहेत. भारताच्या टॉप ऑर्डरसाठी तो मोठा धोका आहे.

शाकिब अल हसन

सध्याच्या काळातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या शकीब अल हसनकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने सामन्याचा मार्ग बदलण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. शाकिबकडेही भरपूर अनुभव आहे, त्याची फिरकी भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकते तर त्याची झंझावाती फलंदाजी गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकते.

तंजीम हसन साकिब

तंजीम हसन साकिबही भारतासाठी अडचणीचे कारण बनू शकतो. हा गोलंदाज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सध्याच्या विश्वचषकात शाकिबने ५ सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या असून सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो टॉप-५ मध्ये सामील झाला आहे.

लिटन दास

बांगलादेशच्या फलंदाजीचा प्रमुख मानला जाणारा यष्टिरक्षक-फलंदाज लिटन दासकडेही भरपूर अनुभव आहे. त्याचा अनुभव संघाला उपयोगी पडू शकतो. लिटन दास हा उत्कृष्ट फलंदाज असून मोठ्या सामन्यांमध्ये धावा कशा करायच्या हे त्याला माहीत आहे. त्याची विकेट लवकर घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

तस्किन अहमद

बांगलादेश संघाचा उपकर्णधार तस्किन अहमदमध्येही भारताला अडचणीत आणण्याची ताकद आहे. भारतीय संघालाही या वेगवान गोलंदाजापासून सुरक्षित राहण्याची गरज आहे. तस्किनने यापूर्वीही भारताला अडचणीत आणले आहे. तस्किनने या विश्वचषकात ५ सामन्यांत ७ विकेट घेतल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या