टीम इंडियाला शनिवारी (२२ जून) टी-20 वर्ल्ड कप २०२४ च्या सुपर-८ मध्ये बांगलादेशविरुद्ध दुसरा सामना खेळायचा आहे. उभय संघांमधील हा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून सुरू होईल.
याआधी टीम इंडियाने सुपर-८ च्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता. त्याचवेळी बांगलादेशला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. अशा परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पण या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावटआहे. या सामन्यात पावसाचा अडथळा येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील अनेक सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्याचबरोबर अनेक सामन्यांमध्ये षटकेही झाली आहेत. आता या सामन्यातही पावसाचा व्यत्यय येऊ शकतो.
हवामान अंदाजानुसार, या सामन्यादरम्यान अँटिग्वामध्ये पावसाची ४० टक्के शक्यता आहे आणि आकाश ढगाळ राहू शकते. पावसासोबतच वादळामुळेही या सामन्यात व्यत्यय येऊ शकतो.
टीम इंडियासाठी ही स्पर्धा आतापर्यंत चांगली राहिली आहे. त्यांना एकाही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला नाही. भारतीय संघाने आत्तापर्यंत खेळलेल्या ५ पैकी ४ सामने जिंकले असून १ सामना पावसामुळे रद्द झाला आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाने हा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीत जवळपास पोहोचतील. त्याचबरोबर हा सामना बांगलादेशसाठी करा किंवा मरो असा असेल. बांगलादेशचा पराभव झाल्यास ते स्पर्धेतून बाहेर पडू शकतात.
भारत: विराट कोहली, रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
बांगलादेश : तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हरदोय, झाकीर अली, शकीब अल हसन, महमुदुल्ला, लिटन दास (विकेटकीपर), तन्झिद हसन शाकिब, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान.
संबंधित बातम्या