भारत आणि बांगलादेश यांच्यात आज (१२ ऑक्टोबर) तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना खेळला जात आहे. हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात टीम इंडियाने संघात एक बदल केला आहे.
अर्शदीप सिंग याला सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी फिरकीगोलंदाज रवी बिष्णोई हा सामना खेळत आहे. तर बांगलादेशने संघात दोन बदल केले आहेत. हर्षित राणा या सामन्यातून पदार्पण करणार होता, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकला नाही.
भारते (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रायन पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मयंक यादव.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन, तौहिद हृदयॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजांसाठी पूर्णपणे अनुकूल असू शकते. या सामन्यात नाणेफेकीची फारशी भूमिका असणार नाही. दोन्ही डावात येथे मोठी धावसंख्या उभारता येईल, असे मानले जात आहे.
गेल्या दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये या खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे. त्याचवेळी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
शेवटच्या टी-20 सामन्यावर पावसाचे सावट आहे. Accuweather च्या अहवालानुसार, सामन्यादरम्यान ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तापमान २३ ते २६ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून पावसाची शक्यता २३ टक्के आहे.
तर ताशी २४ किलोमीटर वेगाने वारे वाहतील तर आर्द्रता ८९ टक्के राहील. मात्र, सामना पूर्ण होईल, अशी आशा आहे.
संबंधित बातम्या