भारत आणि बांगलादेश यांच्यात ६ ऑक्टोबरपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवू शकते. सूर्यासोबत हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसनलाही संधी मिळू शकते. रियान पराग, शिवम दुबे आणि हर्षित राणा यांनाही टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकते.
सूर्याविषयी बोलायचे झाले तर त्याने यापूर्वीही टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवले आहे. कर्णधार म्हणून त्याचा रेकॉर्ड चांगला आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेसाठी संघाची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. कर्णधारपदात सूर्याचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. अभिषेक शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांना सलामीची संधी मिळू शकते.
तर संजू सॅमसन याला विकेटकीपर फलंदाज म्हणून टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकते. रियान परागने आतापर्यंत अनेक प्रसंगी दमदार परफॉर्मन्स दिला आहे. त्याला मधल्या फळीसाठी संधी देण्यात येऊ शकते.
टीम इंडियाची बॉलिंग युनिट खूप मजबूत असेल. अर्शदीप सिंगसोबतच आवेश खान आणि हर्षित राणा यांना संधी मिळू शकते. टीम इंडिया फिरकीपटू रवी बिश्नोईवरही विश्वास ठेवू शकते. अर्शदीपबद्दल सांगायचे तर त्याने अनेक प्रसंगी घातक गोलंदाजी केली आहे. बांगलादेशविरुद्धही तो गेम चेंजर ठरू शकतो.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील T20 मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाणार आहे. मालिकेतील दुसरा सामना ९ ऑक्टोबरला दिल्लीत खेळवला जाईल. तर मालिकेतील शेवटचा सामना ९ ऑक्टोबरला हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.
बांगलादेशविरुद्धचा भारताचा संभाव्य टी-20 संघ - अभिषेक शर्मा, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रियान पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान. हर्षित राणा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी.