भारत आणि बांगलादेेश यांच्यात आज (९ ऑक्टोबर) दिल्लीत दुसरा टी-20 सामना खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीस आलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. टॉप तीन फलंदाज लवकर तंबूत परतले.
पण यानंतर दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडिमयवर नितीश कुमार रेड्डीचे वादळ आले. नितीशने अवध्या ३४ चेंडूत ७४धावांचा पाऊस पाडला. त्याने ७ षटकार ४ चौकार मारले.
तो १३व्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. मुस्तफिजूर रहमान याने मेहदी हसन मिराज याच्या हाती झेलबाद केले.
सुरुवातीच्या धक्क्यानंतर नितीश रेड्डी आणि पाचव्या क्रमांकावर आलेल्या रिंकू सिंग यांनी आक्रमक फलंदाजी करत धावांचा वेग कमी होऊ दिला नाही.
नितीश रेड्डी याने दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावले. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२०म ध्ये पदार्पण करणाऱ्या नितीशने दुसऱ्या सामन्यात रिंकूसोबत शानदार भागीदारी करत भारताला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरले
नितीशने आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी २७ चेंडू घेतले. नितीशची सुरुवात संथ होती आणि त्याने पहिल्या १३ चेंडूत १३ धावा केल्या, मात्र पुढच्या १४ चेंडूत त्याने आक्रमक फलंदाजी करत ३७ धावा केल्या.
१४व्या षटकात मुस्तफिजूरने नितीश रेड्डी याची शानदार खेळी संपुष्टात आणली. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या नितीशने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. नितीशने ३४ चेंडूंत ४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ७४ धावा केल्या. कठीण परिस्थितीत त्याने रिंकू सिंगसोबत चौथ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे भारताला कठीण परिस्थितीवर मात करता आली.
भारत: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.
बांगलादेश : परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, महमुदुल्लाह, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकीब, मुस्तफिजुर रहमान.