Sanju Samson: सूर्याची नवी चाल! बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत संजू सॅमसनवर महत्त्वाची जबाबदारी!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sanju Samson: सूर्याची नवी चाल! बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत संजू सॅमसनवर महत्त्वाची जबाबदारी!

Sanju Samson: सूर्याची नवी चाल! बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत संजू सॅमसनवर महत्त्वाची जबाबदारी!

Updated Oct 05, 2024 08:28 PM IST

India vs Bangladesh t20 Series: भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने बांगलादेशविरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारताचा यष्टीरक्षक संजू सॅमसनवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. (PTI)

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संजू सॅमसनला कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माचा सलामीचा जोडीदार म्हणून निश्चित केले आहे. नऊ वर्षांपूर्वी २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केल्यापासून सॅमसनला सलामीवीर म्हणून तर सोडाच, संपूर्ण मालिकेसाठी पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक म्हणून इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे, असे क्वचितच घडले आहे. पण ग्वाल्हेरमध्ये सुरू होणाऱ्या बांगलादेश टी-२० सामन्यांमुळे त्यात बदल होणार आहे.

या टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघात अभिषेक शर्माच्या रूपात केवळ सलामीवीराची निवड करण्यात आली आहे. इतरांमध्ये संजू सॅमसन हा एकमेव असा खेळाडू आहे, ज्याला टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करण्याचा अनुभव आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने भारतासाठी आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सलामीवीर म्हणून फलंदाजी केली आहे. एवढेच नव्हेतर तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरही त्याने चांगली फलंदाजी केली आहे. भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमारने ग्वाल्हेर येथे या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले की, बांगलदेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यात संजू सॅमसन अभिषेक शर्मासोबत सलामीला येईल.

सॅमसनने भारताकडून खेळलेल्या ३० टी-२० सामन्यांमध्ये त्याने पाच वेळा सलामीला फलंदाजी केली आहे. २०२२ मध्ये आयर्लंडविरुद्धची ७७ धावांची खेळी काढून घेतली तर सॅमसनला वरच्या फळीत फारसे यश मिळत नाही. पण राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याला पॉवरप्लेमध्ये भरपूर यश मिळाले. सध्या जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्या धडाकेबाज जोडीला अनुसरून तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असला तरी सॅमसन त्याच्याकडे असलेल्या शॉट्सच्या श्रेणीमुळे नव्या चेंडूविरुद्ध विध्वंसक ठरू शकतो.

बांगलादेशविरुद्धचे हे तीन टी-२० सामने सॅमसनला टी-२० इलेव्हनमध्ये आपले स्थान पक्के करण्याची सुवर्णसंधी असेल. टी-२० विश्वचषकाच्या पुढील हंगामाला अजून दोन वर्षे बाकी आहेत, पण जर त्याला संघात राहायचे असेल तर त्याला यष्टीरक्षक आणि सलामीवीर म्हणून तीन सामन्यांपेक्षा चांगले व्यासपीठ मिळेल. निवड समितीने ऋषभ पंतला विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या मालिकेसाठी सॅमसनला पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक म्हणून निवडण्यात आले. आयपीएलमध्ये पुनरागमन केल्यापासून पंत सातत्याने क्रिकेट खेळत होता. कॅप्टन सूर्यासाठीही पुनरागमन झाल्यासारखे असेल. बुची बाबू करंडक सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना बोटाला झालेल्या दुखापतीमुळे तो दुलीप करंडक खेळू शकला नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या