Sanju Samson Century : संजू सॅमसनचं वादळी शतक, बांगलादेशच्या गोलंदाजांना ताणून मारलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sanju Samson Century : संजू सॅमसनचं वादळी शतक, बांगलादेशच्या गोलंदाजांना ताणून मारलं

Sanju Samson Century : संजू सॅमसनचं वादळी शतक, बांगलादेशच्या गोलंदाजांना ताणून मारलं

Oct 12, 2024 08:34 PM IST

ind vs ban sanju samson century : सॅमसनने हैदराबादमध्ये दमदार फलंदाजी करत शतक झळकावले आहे. त्याचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक आहे.

Sanju Samson Century : संजू सॅमसनचं वादळी शतक, बांगलादेशच्या गोलंदाजांना ताणून मारलं
Sanju Samson Century : संजू सॅमसनचं वादळी शतक, बांगलादेशच्या गोलंदाजांना ताणून मारलं (AFP)

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा टी-20 सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात संजू सॅमसन याने वादळी शतक ठोकले आहे.

सॅमसनसोबतच सूर्यकुमार यादव यानेही स्फोटक फलंदाजी केली आहे. या सामन्यात टीम इंडियाने अनेक विक्रम मोडले आहेत. सॅमसनने अवघ्या ४० चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

वास्तविक, भारताने बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामीला आले. पण अभिषेक काही विशेष करू शकला नाही. तो ४ धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला.

सॅमसनचे रेकॉर्डब्रेक शतक 

यानंतर सूर्या आणि संजूने कहर केला. टीम इंडियाने अवघ्या ७.१ षटकात १०० धावांचा टप्पा पार केला. यानंतरही स्फोटक खेळी सुरूच राहिली.

हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्ध फलंदाजी करताना सॅमसनने ४७ चेंडूंचा सामना करत १११ धावा केल्या. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ८ षटकार मारले. सॅमसनची खेळी संस्मरणीय ठरली. सॅमसनने ४० चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केले. T20 इंटरनॅशनलमध्ये पूर्ण सदस्य असलेल्या संघांच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर संजूने चौथे सर्वात वेगवान शतक ठोकले आहे.

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम डेव्हिड मिलरच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना मिलरने बांगलादेशविरुद्ध ३५ चेंडूत शतक झळकावले होते. तर रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध ३५ चेंडूत शतक झळकावले होते. 

त्यामुळे रोहित आणि मिलर संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. जॉन्सन चार्ल्सने ३९ चेंडूत शतक झळकावले. यानंतर संजूची ही खेळी आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रायन पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मयंक यादव.

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन, तौहिद हृदयॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब.

Whats_app_banner