Mominul Haque : मोमिनुल हकने शतक ठोकून २० वर्षांचा दुष्काळ संपवला, कानपूरच्या ग्रीन पार्कवर घडली ही खास कामगिरी-ind vs ban mominul haque create record after scoring century in kanpur test bangladesh all out 233 on runs ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mominul Haque : मोमिनुल हकने शतक ठोकून २० वर्षांचा दुष्काळ संपवला, कानपूरच्या ग्रीन पार्कवर घडली ही खास कामगिरी

Mominul Haque : मोमिनुल हकने शतक ठोकून २० वर्षांचा दुष्काळ संपवला, कानपूरच्या ग्रीन पार्कवर घडली ही खास कामगिरी

Sep 30, 2024 01:27 PM IST

IND VS BAN Kanpur test : बांगलादेशने चौथ्या दिवसाची सुरुवात तीन गडी बाद १०७ धावांवरून केली. मोमिनुलने आपला डाव ४० धावांवरून पुढे वाढवला. दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत होत्या, पण मोमिनुल ठाम होता. पहिले सत्र संपण्यापूर्वी त्याने आपले शतक पूर्ण केले. त्याच्या कारकिर्दीतील हे १३ वे कसोटी शतक आहे.

IND VS BAN Kanpur test, Mominul Haque : मोमिनुल हकने शतक ठोकून २० वर्षांचा दुष्काळ संपवला, कानपूरच्या ग्रीन पार्कवर घडली ही खास कामगिरी
IND VS BAN Kanpur test, Mominul Haque : मोमिनुल हकने शतक ठोकून २० वर्षांचा दुष्काळ संपवला, कानपूरच्या ग्रीन पार्कवर घडली ही खास कामगिरी (AP)

कानपूर कसोटीत भारताने पहिल्या डावात (३० सप्टेंबर) बांगलादेशला २३३ धावांवर सर्वबाद केले. बांगलादेशकडून मोमिनुल हकने दमदार फलंदाजी केली. त्याने नाबाद शतक झळकावले. आज सामन्याचा चौथा दिवस असून सामन्याचा दुसरा आणि तिसरा दिवस पावसाने वाहून गेला.

दरम्यान, बांगलादेशचा फलंदाज मोमिनुल हकने कानपूर कसोटी सामन्यात शतक झळकावून एक विक्रम केला आहे. मोमिनुलचे हे शतक कठीण परिस्थितीत आले. भारतीय गोलंदाज जेव्हा वर्चस्व गाजवत होते आणि सतत विकेट घेत होते, तेव्हा या डाव्या हाताच्या फलंदाजाने ग्रीन पार्क स्टेडियमच्या खेळपट्टीवर पाय रोवला आणि शतक झळकावून विक्रम केला.

पावसामुळे या सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. दोन्ही दिवस एकही चेंडू टाकता आला नाही. पहिल्या दिवशी केवळ दीड सत्राचा खेळ होऊ शकला. यानंतर थेट चौथ्या दिवशी खेळ सुरू झाला आणि मोमिनुलने पहिल्याच सत्रात शतक पूर्ण केले.

बांगलादेशने चौथ्या दिवसाची सुरुवात तीन गडी बाद १०७ धावांवरून केली. मोमिनुलने आपला डाव ४० धावांवरून पुढे वाढवला. दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत होत्या, पण मोमिनुल ठाम होता. पहिले सत्र संपण्यापूर्वी त्याने आपले शतक पूर्ण केले. त्याच्या कारकिर्दीतील हे १३ वे कसोटी शतक आहे.

मोमिनुलने या शतकासह इतिहास रचला. १९८४ नंतर कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर शतक झळकावणारा तो दुसरा परदेशी फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेच्या अँड्र्यू हॉलने २००४ मध्ये याच मैदानावर शतक झळकावले होते, त्याने १६३ धावा केल्या होत्या. त्यानंतर २० वर्षांनंतर या मैदानावर परदेशी खेळाडूने शतक झळकावले आहे.

शाकिब, लिटन अपयशी

चौथ्या दिवशी बांगलादेशला पहिला धक्का मुशफिकुर रहीमच्या रूपाने बसला. तो बुमराहचा चेंडू समजू शकला नाही आणि बोल्ड झाला. त्याच्यानंतर लिटन दासला मोहम्मद सिराजने बाद केले. दासला बाद करण्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची भूमिका महत्त्वाची होती. रोहितने मिडऑफला एका हाताने अप्रतिम झेल घेतला.

शाकिब अल हसनही भारतासाठी अडचणीत येऊ शकला असता, मात्र यावेळी सिराजने आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने त्याचा डाव संपवला. मिडऑफवर शाकिबने अश्विनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटला नीट लागला नाही. चेंडू हवेत उंच गेला, सिराजने धावत जात अप्रतिम झेल घेतला.

Whats_app_banner