भारत आणि बांगलादेेश यांच्यात आज (९ ऑक्टोबर) दिल्लीत दुसरा टी-20 सामना खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित २० षटकात ९ बाद २२१ धावांचा डोंगर उभारला आहे.
भारताकडून नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांनी शानदार अर्धशतके झळकावली, ज्यांच्या बळावर संघाने २० षटकांत ९ गडी गमावून २२१ धावा केल्या.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-२०मध्ये टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पण भारताचे टॉप तीन फलंदाज लवकर बाद झाले पण त्यानंतर नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांनी शतकी भागिदारी करत धावांचा पाऊस पाडला.
टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा २५ धावा होईपर्यंत पॅव्हेलियनमध्ये परतले होते. सॅमसन १० धावा करून बाद झाला तर अभिषेक शर्मा १५ धावा करून बाद झाला. त्याच्यापाठोपाठ कर्णधार सूर्यकुमार यादवही ८ धावा करून स्वस्तात बाद झाला. त्यानंतर नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांनी मिळून अवघ्या ४८ चेंडूत १०८ धावा जोडून भारताला मजबूत स्थितीत आणले.
नितीशने ३४ चेंडूत ७४ धावा केल्या, ज्यात त्याने ४ चौकार आणि ७ षटकार मारले. दुसरीकडे रिंकूने २९ चेंडूत ५३ धावा केल्या. त्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारले. शेवटी हार्दिक पांड्यानेही फटकेबाजी केली. हार्दिकने १९ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या.
बांगलादेशकडून तस्किन अहमदने ४ षटकांत केवळ १६ धावा देत दोन बळी घेतले. इतर सर्व गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली.
एकवेळ टीम इंडियाची धावसंख्या १२ षटकात ३ विकेट गमावून १२२ धावा होती. पुढच्याच षटकात मेहदी हसनने २६ धावा दिल्या. इथून धावांना एवढा वेग आला की चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत राहिला. अखेरच्या ८ षटकांमध्ये भारतीय संघाने तुफानी शैलीत फलंदाजी करत एकूण ९९ धावा केल्या.
संबंधित बातम्या