भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूर येथे सुरू असलेला दुसरा कसोटी सामना रोमांचक वळणावर आला आहे. या कसोटी सामन्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
दोन्ही देशांमधला पहिला टी-20 सामना ६ ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाईल. टी-20 मालिकेतील सर्व सामने संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात यष्टिरक्षक संजू सॅमसन नव्या अवतारात दिसणार आहे. तो अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करू शकतो. तर वेगवान स्टार मयंक यादवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागू शकते.
पहिल्या टी-20 मध्ये भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले तर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन सलामीला येऊ शकतात. कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे. त्यानंतर शिवम दुबे चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. दुबे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडूनही याच नंबरवर खेळतो.
यानंतर स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर खेळेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर रिंकू सिंग सहाव्या क्रमांकावर आणि रियान पराग सातव्या क्रमांकावर खेळताना दिसेल. स्फोटक फलंदाजीसोबतच पराग फिरकी गोलंदाजीतही निष्णात आहे. फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आठव्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो.
लेगस्पिनर रवी बिश्नोई हा मुख्य फिरकी गोलंदाज असू शकतो. त्याला साथ देण्यासाठी सुंदर आणि पराग आहेत. वेगवान गोलंदाजीत हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग ही जोडी ॲक्शनमध्ये दिसू शकते. बाकी हार्दिक तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या भूमिकेत दिसणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या Tटी-20 साठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन - अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, रायन पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग.