IND vs BAN : हर्षित राणाचे पदार्पण? संजू-हार्दिक आणि मयंक यादव बाहेर? आज अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs BAN : हर्षित राणाचे पदार्पण? संजू-हार्दिक आणि मयंक यादव बाहेर? आज अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

IND vs BAN : हर्षित राणाचे पदार्पण? संजू-हार्दिक आणि मयंक यादव बाहेर? आज अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

Oct 12, 2024 10:24 AM IST

हैदराबादमध्ये आज भारत आणि बांगलादेश यांच्यात तिसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडिया पूर्णपणे बदललेली दिसू शकते.

IND vs BAN : हर्षित राणाचे पदार्पण? संजू-हार्दिक आणि मयंक यादव बाहेर? आज अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन
IND vs BAN : हर्षित राणाचे पदार्पण? संजू-हार्दिक आणि मयंक यादव बाहेर? आज अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन (AP)

भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने एकतर्फी जिंकून टीम इंडियाने मालिकेत आधीच अजेय आघाडी मिळवली आहे. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (१२ ऑक्टोबर) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडियाने ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला. 

यानंतर दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाने बांगलादेशचा ८६ धावांनी पराभव केला. अशा प्रकारे भारतीय संघाने घरच्या मैदानावर सलग सातवी टी-२० मालिका जिंकली. आता सूर्या आर्मीला तिसऱ्या टी-२० मध्येही विजयाची नोंद करायची आहे.

तिलक वर्मा, बिश्नोई आणि जितेश शर्मा यांना संधी मिळणार?

टीम इंडियाने मालिका जिंकली आहे. अशा स्थितीत बेंचवर बसलेल्या काही खेळाडूंना तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२०मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या मालिकेत तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि जितेश शर्मा यांना संधी मिळालेली नाही. मात्र, तिसऱ्या टी-20 मध्ये कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर बेंचवर बसलेल्या खेळाडूंना संधी देऊ शकतात.

हर्षित राणा पदार्पण करणार?

स्पीड स्टार मयंक यादवला ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. मयंक दुसऱ्या टी-20 मध्येही खेळला. आता युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला तिसऱ्या टी-20 मध्ये संधी मिळणार की नाही हे पाहायचे आहे. हर्षित आयपीएल २०२४ नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची वाट पाहत आहे.

तिसऱ्या T20 मध्ये भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या/तिलक वर्मा, रियान पराग/जितेश शर्मा, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, मयंक यादव राणा आणि अर्शदीप सिंग.

 

Whats_app_banner