भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी-20 सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करेल.
या सामन्यासाठी बांगलादेशने संघात एक बदल केला आहे. पाहुण्या संघात शौरीफुल इस्लामच्या जागी तन्झीम हसन साकिब याचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक दरम्यान सांगितले की, भारतीय संघाने प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
भारत: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.
बांगलादेश : परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, महमुदुल्लाह, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकीब, मुस्तफिजुर रहमान.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, गोलंदाजांसाठी धावांचा वेग रोखणे फार कठीण काम झाले आहे. ये लक्ष्याचा सहज पाठलाग करता येईल. आयपीएल २०२४ मध्ये या मैदानावर खेळले गेलेले सर्वच सामने खूप उच्च स्कोअरिंग पाहायला मिळाले.
हवामानाचा विचार करता, दव देखील महत्त्वाची भूमिका बजावू शकते, ज्यामुळे गोलंदाजी संघाला नंतर लक्ष्याचा बचाव करणे सोपे होणार नाही. या मैदानावर आतापर्यंत १३ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी केवळ ४ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळवता आला. तर ९ वेळा नंतर फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे.