भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना भारताने जिंकला आहे. चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या या कसोटीत भारताने बांगलादेशचा २८० धावांनी पराभव केला.
हा सामना चौथ्या दिवशीच (२२ सप्टेंबर) सामना संपला. ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ २३४ धावांत सर्वबाद झाला आणि भारताने मोठा विजय मिळवला.
भारताच्या विजयात अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने मोठे योगदान दिले. बॉल आणि बॅटने दमदार कामगिरी करून त्याने बांगलादेशला दुहेरी दणका दिला.
तत्पूर्वी, या सामन्यात टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने सुरुवातीच्या विकेट पटकन गमावल्या, पण त्यानंतर रविचंद्रन अश्विनने शतक झळकावून संघाला बळ दिले. या डावात रवींद्र जडेजाने अश्विनला चांगली साथ दिली. या दोघांनी ७व्या विकेटसाठी १९९ (२४० चेंडू) धावांची भागीदारी केली. अश्विनने संपूर्ण सामन्यात ६ विकेट घेतल्या. भारतीय फिरकीपटूने दुसऱ्या डावात सर्व ६ विकेट घेतल्या.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने सर्वबाद ३७६ धावा केल्या. आर अश्विनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि १३३ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११३ धावा केल्या.
त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या बांगलादेशला भारतीय गोलंदाजांनी ४७.१ षटकांत १४९ धावांत गुंडाळले. या डावात जसप्रीत बुमराहने भारताकडून सर्वाधिक ४ बळी घेतले.
यानंतर टीम इंडिया दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरली आणि ४ बाद २८७ धावा करून डाव घोषित केला. यादरम्यान शुभमन गिलने १७६ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ११९ धावा केल्या. याशिवाय ऋषभ पंतने १२८ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०९ धावा केल्या. डाव घोषित केल्यानंतर भारतीय संघाने बांगलादेशला ५१५ धावांचे लक्ष्य दिले.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशच्या सलामीवीरांना चांगली सुरुवात केली होती. पण त्यांची मधली फळी अपयशी ठरली. अशा स्थितीत भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला १३४ धावांवर ऑल आऊट केले. या डावात रविचंद्रन अश्विनने ६ विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना २८० धावांनी जिंकला.