KL Rahul Video : केएल राहुलची विकेट थर्ड अम्पायरनं ढापली? भारतीय क्रिकेटप्रेमी चिडले! पाहा आऊट की नॉट आऊट?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KL Rahul Video : केएल राहुलची विकेट थर्ड अम्पायरनं ढापली? भारतीय क्रिकेटप्रेमी चिडले! पाहा आऊट की नॉट आऊट?

KL Rahul Video : केएल राहुलची विकेट थर्ड अम्पायरनं ढापली? भारतीय क्रिकेटप्रेमी चिडले! पाहा आऊट की नॉट आऊट?

Nov 22, 2024 01:59 PM IST

BGT test news : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात तिसऱ्या पंचांनी केएल राहुल याला चुकीच्या पद्धतीनं आऊट दिल्यावरून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

केएल राहुल
केएल राहुल (X)

India vs Australia Pert Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना वादाशिवाय पार पडला असं क्वचितच घडतं. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात त्याची पुनरावृत्ती झाली आहे. या कसोटीत केएल राहुलच्या विकेटवरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. थर्ड अम्पायरनं केएलला ज्या पद्धतीने आऊट दिले, त्यावरून भारतीय क्रिकेट चाहते आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये प्रचंड संताप आहे.

एकीकडे भारतीय संघ एकापाठोपाठ एक विकेट गमावत असताना केएल राहुलनं एका बाजूनं किल्ला लढवत ठेवला होता. या सामन्यात केएल राहुलनं यशस्वी जयस्वालसोबत डावाची सुरुवात केली. यशस्वी आणि देवदत्त पडिक्कल खातं न उघडता बाद झाले, तर विराट कोहली अवघ्या ५ धावांवर बाद झाला. भारतानं ३२ धावांत तीन गडी गमावले.

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांच्या धोकादायक गोलंदाजीसमोर केएल राहुल निकरानं लढत होता. लंच ब्रेकच्या काही वेळापूर्वी केएल राहुल मिचेल स्टार्कच्या चेंडूवर बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानं ७४ चेंडूत २६ धावा केल्या. २२.२ षटकांत अ‍ॅलेक्स कॅरीनं स्टार्कच्या चेंडूवर यष्टीमागील झेलसाठी जोरदार आपील केलं. मैदानावरील पंचांनी राहुलला नॉट आऊट दिलं, त्यानंतर ऑस्ट्रेलियानं रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. स्नीकोमीटरवर स्पाइक दिसला, पण चेंडू बॅटला स्पर्श केल्याचा कोणताही पुरावा नव्हता.

रिप्लेमध्ये कोठूनही चेंडू बॅटला स्पर्श केल्याचं स्पष्ट झालं नाही. तरीही थर्ड अम्पायरनं मैदानातील अम्पायरचा निर्णय बदलला आणि केएलला आऊट दिलं. त्यामुळं केएल राहुल प्रचंड निराश झाला. ही विकेट ऑस्ट्रेलियासाठी मोठी विकेट होती. भारताचा अर्धा संघ ६० धावांच्या आतच पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

Whats_app_banner