भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. टीम इंडियाचे खेळाडू पर्थमध्ये आठवडाभरापासून सराव करत आहेत. या मालिकेतील पहिला सामना (२२ नोव्हेंबर) पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे.
सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच २१ नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यादरम्यान दोघांनी अनेक मोठे खुलासे केले.
मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाची धुरा कर्णधार जसप्रीत बुमराहच्या हाती आहे. खरंतर, रोहित शर्मा नुकताच वडील झाला आहे, त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाला जाऊ शकला नाही.
भारतीय क्रिकेट संघाच्या प्लेइंग ११ बद्दल कर्णधार जसप्रीत बुमराहला पत्रकार परिषदेत विचारण्यात आले. मालिकेच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? यावर बुमराहने हसत हसत उत्तर दिले आणि सांगितले की, टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन ठरली आहे.
मात्र, याचा खुलासा तो उद्या म्हणजेच २२ नोव्हेंबरला सामन्याच्या दिवशी करणार आहे. टीम इंडियाचे काही स्टार खेळाडू मालिकेतील पहिल्या सामन्याला मुकणार आहेत. ज्यामध्ये रोहित शर्मासह शुभमन गिलचेही नाव आहे. मात्र बुमराहने याबाबत कोणतेही विशेष अपडेट दिलेले नाही.
मालिकेच्या पहिल्या सामन्यात काही खेळाडू टीम इंडियासाठी पदार्पणही करू शकतात. त्या खेळाडूंमध्ये नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा यांच्या नावांचा समावेश होऊ शकतो. बुमराहने पत्रकार परिषदेत सांगितले की, टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी या मालिकेदरम्यान मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्यात अशी माझी इच्छा आहे.
बुमराहने असेही सांगितले की, या मालिकेतील पहिल्या सामन्यात तो कर्णधार होईल हे माहित नव्हते, पण ऑस्ट्रेलियात आल्यानंतर संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षकाने सांगितले की रोहित शर्मा पहिल्या सामन्याला मुकणार आहे. अशा स्थितीत त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात येत आहे.
पर्थ कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, हर्षित राणा.