भारत- ऑस्ट्रेलियात रंगणार टी-२० चा थरार; संघ, वेळ, ठिकाणापासून लाईव्ह स्ट्रिमिंगपर्यंत सर्व माहिती
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  भारत- ऑस्ट्रेलियात रंगणार टी-२० चा थरार; संघ, वेळ, ठिकाणापासून लाईव्ह स्ट्रिमिंगपर्यंत सर्व माहिती

भारत- ऑस्ट्रेलियात रंगणार टी-२० चा थरार; संघ, वेळ, ठिकाणापासून लाईव्ह स्ट्रिमिंगपर्यंत सर्व माहिती

Nov 22, 2023 05:45 PM IST

IND vs AUS T20 series Details In Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेबद्दल A टू Z माहिती.

India vs Australia
India vs Australia

India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेत भारताचा युवा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार आहे. एका वाक्यात सांगायचे झाले भारताचा युवा संघ थेट बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका विशाखापट्टणम, तिरुवनंतपुरम, गुवाहाटी, रायपूर आणि बेंगळुरू येथे खेळवली जाईल. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ०७.०० वाजतापासून खेळले जातील. यापूर्वी अर्धातास म्हणजेच ६.३० मिनिटांनी नाणेफेक होईल. या मालिकेचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स १८ वर केले जाईल. तसेच जिओ सिनेमा अॅपद्वारे तुम्ही या मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना- २३ नोव्हेंबर २०२३ (राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम)

दुसरा सामना- २६ नोव्हेंबर २०२३ (ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम)

तिसरा सामना- २८ नोव्हेंबर २०२३ (बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी)

चौथा सामना- ०१ डिसेंबर २०२३ (विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर)

पाचवा सामना- ०३ डिसेंबर २०२३ (राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद)

भारताचा संघ: सूर्यकुमार यादव (कप्तान), ऋतुराज गायकवाड (उप-कप्तान), ईशान किशन,यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा,रिंकू सिंह,जितेश शर्मा (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलियाचा संघ: मॅथ्यू वेड (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, जोश इंग्लिस, तन्वीर संघा, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झाम्पा.

Whats_app_banner

संबंधित बातम्या