IND vs AUS 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी खेळली जात आहे. मात्र, या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन पाहून टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर प्रचंड संतापले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना पर्थ स्टेडियमवर खेळला जात आहे. वॉशिंग्टन सुंदरला फिरकी अष्टपैलू म्हणून पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. तर, अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या दोघांनाही वगळण्यात आले. गावसकर यांनी लाइव्ह टीव्हीवर या निर्णयाबद्दल मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्त्व करत असलेला कर्णधार जसप्रीत बुमराहवर टीका केली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जास्त असलेल्या लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर म्हणाले की, 'ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील प्लेईंग इलेव्हनमधून आर अश्विन आणि रविंद्र जाडेजा यांना वगळण्यात आल्याने आश्चर्य वाटत आहे. त्यांनी कसोटी सामन्यांमध्ये ९०० विकेट्स घेतल्या आहेत. ते केवळ भारतात खेळू शकतील, असे खेळाडू नाहीत. ते अत्यंत हुशार आणि अनुभवी गोलंदाज आहेत. जरी त्यांना विकेट मिळाले नाही तरी ते आपल्या हुशारीमुळे स्कोअरिंग रेट कमी करू शकतात.
गावस्कर पुढे म्हणाले, 'मला वाटले की, या ऑस्ट्रेलियन विकेट्सवर खूप लांब बाऊंड्री आहेत, त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही या दोघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करतील. पण हे नवीन व्यवस्थापन आणि नवीन विचार आहेत. युवा खेळाडू यांना संघात स्थान दिले, यावर माझा आक्षेप नाही. पण तो कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहे का, हा माझा प्रश्न आहे. तो फारसा प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही आणि त्यामुळे मला वाटते की, नितीशची निवड आशेवर आधारित आहे. सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांप्रमाणे मलाही आशा आहे की तो यशस्वी होईल.
- पहिला कसोटी सामना: २२ ते २६ नोव्हेंबर (पर्थ स्टेडियम, पर्थ)
- दुसरा कसोटी सामना: ०६ डिसेंबर ते १० डिसेंबर (ॲडलेड ओव्हल, ॲडलेड)
- तिसरा कसोटी सामना: १४ ते १८ नोव्हेंबर (द गाबा, ब्रिस्बेन)
- चौथा कसोटी सामना:२६ ते ३० नोव्हेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न)
- पाचवा कसोटी सामना: ३ ते ७ जानेवारी (सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी)