pm xi vs india scorecard today : न्यूझीलंडविरुद्धच्या लाजिरवाण्या कसोटी मालिका पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने टीम इंडियात पुनरागम केले. मात्र, येथेही त्याला सर्वोत्तम कामगिरी करता आलेली नाही.
भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन यांच्यात सुरू असलेल्या सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. कसोटीत डावाची सुरुवात करणारा रोहितने सराव सामन्यात खालच्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र, रोहित जास्त काळ क्रीजवर टिकू शकला नाही. सराव सामन्यात त्याने ११ चेंडूंचा सामना करत केवळ ३ धावा केल्या. चार्ली अँडरसनने त्याला बाद केले.
रोहितने ओपनिंग न करण्याचा निर्णय घेतला. संघ राहुल आणि यशस्वीवर बऱ्यापैकी अवलंबून होता आणि या दोन्ही खेळाडूंनी सराव सामन्यात डावाची सुरुवातही चांगली केली. यानंतर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. रोहित स्वत: चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला.
केएल राहुल २७ धावा करून रिटायर हर्ट झाला. त्यानंतर रोहित फलंदाजीला आला होता. पण ऑस्ट्रेलियातील पहिल्याच सामन्यात रोहित शर्माने चाहत्यांची निराशा केली. त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला रोहित शर्माची फारशी उणीव भासली नाही. त्याच्या अनुपस्थितीत भारताने तो सामना २९५ धावांनी जिंकला.
रोहित शर्मा नुकताच दुसऱ्यांदा पिता झाला आहे. त्याच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला आहे. रोहित शर्मा आता मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ॲक्शनमध्ये दिसणार आहे. हा सामना ६ डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे.
संबंधित बातम्या