IND vs AUS Perth Test : शुभमन गिलचा अंगठा फ्रॅक्चर, पर्थ कसोटीत या गुणी फलंदाजाचं पदार्पण निश्चित
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs AUS Perth Test : शुभमन गिलचा अंगठा फ्रॅक्चर, पर्थ कसोटीत या गुणी फलंदाजाचं पदार्पण निश्चित

IND vs AUS Perth Test : शुभमन गिलचा अंगठा फ्रॅक्चर, पर्थ कसोटीत या गुणी फलंदाजाचं पदार्पण निश्चित

Nov 16, 2024 09:27 PM IST

Shubman Gill injury News In Marathi : शुभमन गिलची दुखापत खूप गंभीर आहे. त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. गिलच्या अनुपस्थितीत अभिमन्यू इसवरनला संधी मिळू शकते.

 IND vs AUS Perth Test : शुभमन गिलचा अंगठा फ्रॅक्चर, पर्थ कसोटीत या गुणी फलंदाजाचं पदार्पण निश्चित
IND vs AUS Perth Test : शुभमन गिलचा अंगठा फ्रॅक्चर, पर्थ कसोटीत या गुणी फलंदाजाचं पदार्पण निश्चित

टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल याच्या दुखापतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार गिलचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर आहे. गिल पर्थ कसोटीतून बाहेर पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. गिलच्या अनुपस्थितीत टीम इंडिया अभिमन्यू ईश्वरनला संधी देऊ शकते.

वास्तविक शुभमन गिल पर्थ कसोटीपूर्वी सराव करत होता. त्याच्यासोबत टीम इंडियाचे इतर खेळाडूही उपस्थित होते. शनिवारी झेल घेताना गिल जखमी झाला. यानंतर तो मैदानातून निघून गेला आणि परत आलाच नाही. शुभमनला स्कॅनिंगसाठी रुग्णालयात नेण्यात आले.

एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार, गिलच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे. पर्थ कसोटीतून तो बाहेर पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

अभिमन्यू इस्वरनला पदार्पणाची संधी मिळू शकते 

टीम इंडियासाठी शुभमन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. पर्थ कसोटीपूर्वी तो फिट नसेल तर अभिमन्यू ईश्वरनला पदार्पणाची संधी मिळू शकते. तो सध्या ऑस्ट्रेलियात असून भारत अ संघाचा भाग आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अभिमन्यूचा रेकॉर्ड चांगला आहे. पण तो अद्याप टीम इंडियाकडून खेळू शकलो नाही. त्याने १०१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ७६१४ धावा केल्या आहेत. त्याने लिस्ट ए मध्ये ३८४७ धावा केल्या आहेत.

देवदत्त पडिक्कल याच्यावरही नजर

टीम इंडिया देवदत्त पडिक्कल यालाही ऑस्ट्रेलियात थांबवू शकते. तो मुख्य संघाचा भाग नाही. पण भारत अ संघाकडून खेळत आहे. सरावाच्या वेळी देवदत्त लयीत दिसला. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने ८८ धावांची शानदार खेळी केली होती.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं वेळापत्रक

पहिला सामना, २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ.

दुसरा सामना, ६ ते १० डिसेंबर, एडलेड ओव्हल, (डे-नाईट).

तिसरा सामना, १४ ते १८ डिसेंबर, गाबा.

चौथा सामना, २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न.

पाचवा सामना, ३ ते ७ जानेवारी, सिडनी.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसीद कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

Whats_app_banner