Ind vs Aus Test : बुमराह आणि कमिन्स इतिहास घडवणार, टेस्ट क्रिकेटमध्ये फक्त ५ वेळा असं घडलंय, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Aus Test : बुमराह आणि कमिन्स इतिहास घडवणार, टेस्ट क्रिकेटमध्ये फक्त ५ वेळा असं घडलंय, पाहा

Ind vs Aus Test : बुमराह आणि कमिन्स इतिहास घडवणार, टेस्ट क्रिकेटमध्ये फक्त ५ वेळा असं घडलंय, पाहा

Updated Nov 21, 2024 01:24 PM IST

Ind vs Aus Perth Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ चा पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ७.५० वाजता सुरू होईल. या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी येताच क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम होणार आहे.

Ind vs Aus Test : बुमराह आणि कमिन्स इतिहास घडवणार, टेस्ट क्रिकेटमध्ये फक्त ५ वेळा असं घडलंय, पाहा
Ind vs Aus Test : बुमराह आणि कमिन्स इतिहास घडवणार, टेस्ट क्रिकेटमध्ये फक्त ५ वेळा असं घडलंय, पाहा (AFP)

क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात १८७७ साली मेलबर्न येथे खेळला गेला. या सामन्याला १४७ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानंतर आतापर्यंत एकाहून एक कसोटी सामने झाले आहेत. आता भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया २२ नोव्हेंबरला पर्थमध्ये आमनेसामने येणार आहेत.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ चा पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ७.५० वाजता सुरू होईल. या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी येताच क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम होणार आहे.

वास्तविक, भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माशिवाय पहिल्या कसोटी सामन्यात उतरणार आहे. रोहित शर्मा सध्या भारतात असून कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पर्थमध्ये टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे.

जसप्रीत बुमराह उद्या सकाळी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्ससोबत पर्थ कसोटीत नाणेफेकीसाठी मैदानात उतरेल तेव्हा मैदानावर एक विलक्षण दृश्य दिसेल. खरं तर  बुमराह आणि कमिन्स मिळून कसोटीत एक अनोखा विक्रम नोंदवतील.

दोन्ही संघांचे कर्णधार वेगवान गोलंदाज असतील

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वेगवान गोलंदाजांनी कसोटी सामन्यात दोन्ही संघांचे नेतृत्व केल्याचे क्वचितच घडले आहे. आता हा मोठा चमत्कार पर्थमध्ये घडणार आहे जेव्हा दोन्ही संघांचे कर्णधार वेगवान गोलंदाज असतील. 

जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्स हे दोघेही वेगवान गोलंदाज आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत असे फक्त ५ वेळा घडले आहे, जेव्हा एखाद्या कसोटी सामन्यात दोन्ही संघाचे कर्णधार वेगवान गोलंदाज होते.

जसप्रीत बुमराहने केवळ एका कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, तर पॅट कमिन्सने दीर्घकाळ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. २०२२ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात बुमराहने टीम इंडियाचे नेतृत्व केले होते.

या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर पॅट कमिन्सने २८ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. या कालावधीत ऑस्ट्रेलियाने १७ सामने जिंकले असून ६ सामने गमावले आहेत. त्याचबरोबर ५ सामने अनिर्णित राहिले आहेत.

या सामन्यांमध्ये दोन्ही संघाचे वेगवान गोलंदाज कर्णधार होते

बॉब विलिस (इंग्लंड) वि. इम्रान खान (पाकिस्तान), १९८२ (बर्मिंगहॅम)

वसीम अक्रम (पाकिस्तान) वि. कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज), १९९७ (पेशावर)

हीथ स्ट्रीक (झिम्बाब्वे) वि. शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका), २००१ (बुलावायो)

जेसन होल्डर (वेस्ट इंडिज) वि. सुरंगा लकमल (श्रीलंका), २०१८ (ब्रिजटाऊन)

पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) वि. टिम साउदी (न्यूझीलंड), २०२४ (ख्रिस्टचर्च)

Whats_app_banner

संबंधित बातम्या