India Vs Australia: आशिया चषक २०२३ स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध येत्या २२ सप्टेंबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने सोमवारी भारतीय संघाची घोषणा केलीय, ज्यात भारताचा अनुभवी गोलंदाज आर अश्विनला संघात स्थान देण्यात आलंय. तर, भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पंरतु, हे तिघेही तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात खेळणार आहेत. यावर भारताचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
आस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी देण्यात आलीय. मात्र, तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात रोहित-विराटला संघात स्थान देण्यात आलंय. यावर अजित आगरकर म्हणाले की, "रोहित आणि कोहली नेहमीच भारतीय संघाचा भाग असतात आणि हार्दिकही आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. यामुळं त्यांच्या फिटनेसबाबत अधिक काळजी घेतली जात आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये कुलदीप यादवचाही समावेश नव्हता. यावरही अजित आगरकरनं स्पष्टीकरण दिलंय. " कुलदीपनं आशिया चषकात चमकदार कामगिरी केली आणि तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यामुळे आम्हाला इतर खेळाडूंनाही आजमावण्याची संधी मिळाली. मोठ्या स्पर्धेपूर्वी आम्ही खेळाडूंना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विश्रांती देणे अधिक महत्त्वाचे आहे."
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकुर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.