Ind vs Aus : ४४८३ चेंडू आणि १४४५ दिवसांनंतर बुमराहने षटकार खाल्ला, १९ वर्षांच्या सॅम कॉन्स्टासनं भीतीच संपवली!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Aus : ४४८३ चेंडू आणि १४४५ दिवसांनंतर बुमराहने षटकार खाल्ला, १९ वर्षांच्या सॅम कॉन्स्टासनं भीतीच संपवली!

Ind vs Aus : ४४८३ चेंडू आणि १४४५ दिवसांनंतर बुमराहने षटकार खाल्ला, १९ वर्षांच्या सॅम कॉन्स्टासनं भीतीच संपवली!

Dec 26, 2024 08:37 AM IST

Sam Konstas vs Jasprit Bumrah : युवा फलंदाज सॅम कॉन्स्टास याने जसप्रीत बुमराहची धुलाई केली. कॉन्स्टासने बुमराहच्या वेगवान चेंडूंचा धैर्याने सामना केला आणि रिव्हर्स स्कूप शॉटच्या मदतीने दोन चौकार आणि एक षटकार ठोकला. यासह त्याने एक खास पराक्रमही केला.

Ind vs Aus : ४४८३ चेंडूंनंतर बुमराहने षटकार खाल्ला, १९ वर्षांच्या सॅम कॉन्स्टासनं भीतीच संपवली!
Ind vs Aus : ४४८३ चेंडूंनंतर बुमराहने षटकार खाल्ला, १९ वर्षांच्या सॅम कॉन्स्टासनं भीतीच संपवली! (AFP)

Jasprit Bumrah Concedes Test Six After 3 Years : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ चा चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. या सामन्यातू १९ वर्षीय सॅम कॉन्स्टास ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. पहिल्याच कसोटीत त्याने छाप सोडली आहे.

क्रिकेट विश्वातील एखादा फलंदाज जसप्रीत बुमराहची धुलाई करतोय, हे तुम्ही पाहिले आहे का? हे क्वचितच ऐकायला मिळते. कसोटीत तर असे घडतच नाही, पण आज मेलबर्नमध्ये हे घडले आहे. १९ वर्षांच्या सॅम कॉन्स्टास याने जसप्रीत बुमराहची धुलाई केली.

सॅम कॉन्स्टास हा जसप्रीत बुमराहच्या पाठीमागेच लागल होता, त्याने बुमराहविरुद्ध रिव्हर्स स्वीपद्वारे विकेटच्या मागे आणि समोरच्या दिशेने अगदी सहज धावा केल्या. बऱ्याच काळानंतर बुमराह फलंदाजाविरुद्ध संघर्ष करताना दिसला. कॉन्स्टासने एका षटकात १४ आणि एका षटकात १८ धावा दिल्या. या दोन षटकांमध्ये सॅमने ४ चौकार आणि २ षटकार मारले.

बुमराहने ३ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये षटकार खाल्ला

जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये ३ वर्षांनंतर आणि ४४८३ चेंडूंनंतर षटकार खाल्ला आहे. याआधी २०२१ मध्ये सिडनी येथे झालेल्या कसोटीत त्याच्याविरुद्ध शेवटचा षटकार मारला गेला होता. त्याच्याविरुद्ध कॅमेरून ग्रीनने षटकार ठोकला होता.

जस्सीला कसोटीत दोन षटकार मारणारा कॉन्स्टास हा जॉस बटलरनंतरचा दुसरा फलंदाज ठरला आहे. २०१८ मध्ये, बटलरने ओव्हलवर बुमराहला २ षटकार ठोकले होते.

कसोटीत बुमराहला षटकार ठोकणारे फलंदाज

एबी डिव्हिलियर्स- २०१८, केप टाऊन

आदिल रशीद- २०१८, नॉटिंगहॅम

मोईन अली- २०१८, साउथॅम्प्टन

जोस बटलर- २०१८, द ओव्हल

जोस बटलर- २०१८, द ओव्हल

नॅथन लियॉन- २०२०, मेलबर्न

कॅमेरॉन ग्रीन- २०२१, सिडनी

सॅम कॉन्स्टास- २०२४, मेलबर्न

सॅम कॉन्स्टास- २०२४, मेलबर्न

सॅम कॉन्स्टासने कसोटी पदार्पणातच अर्धशतक ठोकले

सॅम कॉन्स्टासने कसोटी पदार्पणात झंझावाती अर्धशतक ठोकले. त्याने अवघ्या ५२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, कॉन्स्टास ६६ चेंडूत ६० धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले. कॉन्स्टासला रवींद्र जडेजाने पायचीत केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या