India vs Australia, 1st Semi-Final Highlights : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला उपांत्य सामना मंगळवारी (४ मार्च) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २६५ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हा सामना ४ गडी राखून जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारताच्या विजयाचे हिरो वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि विराट कोहली ठरले. या विजयासह रोहित ब्रिगेडने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जिथे त्याची स्पर्धा दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्या संघाशी होईल.
दुसरा उपांत्य सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ मार्च रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे.
तत्पूर्वी, या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळताना २६४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने हे लक्ष्य ११ चेंडू बाकी असताना पूर्ण केले. भारताच्या विजयात सर्वात मोठा वाटा विराट कोहलीचा होता, जो दबावात खंबीरपणे उभा राहिला आणि त्याने ८४ धावांची खेळी केली.
२६५ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. ४३ धावांवर संघाने २ विकेट गमावल्या होत्या. शुभमन गिल ८ धावा करून बाद झाला तर कर्णधार रोहित शर्मा २८ धावा करून बाद झाला. विराट कोहलीने श्रेयस अय्यरसह १११ चेंडूत ९१ धावांची भागीदारी करत संघाचे नेतृत्व केले. तिसरा धक्का १३४ धावांवर बसला. श्रेयस ४५ धावा करून बाद झाला आणि त्याचे अर्धशतक हुकले.
पण यादरम्यान कोहलीने ५४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तिसऱ्या विकेटनंतर कोहलीने अक्षर पटेलसोबत डाव सावरला आणि चौथ्या विकेटसाठी ५२ चेंडूत ४४ धावांची भागीदारी केली. येथे अक्षर २७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताचा निम्मा संघ २२५ धावांवर बाद झाला. विराट कोहली ८४ धावा करून बाद झाला. कोहलीने केएल राहुलसोबत पाचव्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या.
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची हॅट्ट्रिक केली आहे. याआधी टीम इंडियाने २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते. २०१७ मध्येही भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र यावेळी त्यांना पाकिस्तानकडून १८० धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. आता भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार आहे.
भारतीय संघाने दुबईत चार विकेट्सनी विजय मिळवला . ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय खूपच चांगला होता. दुबईच्या मैदानावर २५० धावांचा टप्पा गाठणारा ऑस्ट्रेलिया हा या स्पर्धेतील पहिला संघ ठरला आहे.
असे असूनही २६५ धावांचे लक्ष्याचा बचाव करण्यात तो अपयशी ठरला. दुबईच्या मैदानावर २५० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा भारत आता जगातील चौथा देश ठरला आहे.
संबंधित बातम्या