मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs AUS Final U19 WC : भारतीय वेळेनुसार सामना किती वाजता सुरू होणार? या चॅनेल-ॲपवर पाहा लाईव्ह

IND vs AUS Final U19 WC : भारतीय वेळेनुसार सामना किती वाजता सुरू होणार? या चॅनेल-ॲपवर पाहा लाईव्ह

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 10, 2024 05:03 PM IST

IND vs AUS Live Streaming U19 World Cup 2024 : अंडर-१९ विश्वचषकाच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा २ विकेट्सने पराभव केला होता. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा १ गडी राखून पराभव करत फायनल गाठली.

IND vs AUS Live Streaming U19 World Cup 2024
IND vs AUS Live Streaming U19 World Cup 2024

u19 world cup final live streaming : अंडर-१९ विश्वचषक २०२४ च्या फायनलमध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. उभय संघांमधील हा अंतिम सामना रविवारी (११ फेब्रुवारी) बेनोनी येथील सहारा पार्क विलोमूर क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

तत्पूर्वी, अंडर-१९ विश्वचषकाच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा २ विकेट्सने पराभव केला होता. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा १ गडी राखून पराभव करत फायनल गाठली.

भारत-ऑस्ट्रेलिया वर्षभरातील तिसरी फायनल

तसं पाहिलं तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्षभरात तिसऱ्यांदा आयसीसी इव्हेंटचा अंतिम सामना होणार आहे. यापूर्वीच्या दोन फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. 

सर्वात आधी WTC फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. ७ जून ते ११ जून २०२३ दरम्यान भारत-ऑस्ट्रेलिया WTC फायनल लंडनमधील 'द ओव्हल' मैदानावर झाली. त्या सामन्यात भारताला २०९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

त्यानंतर १९ नोव्हेंबरला वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवला होता. 

बदला घेण्यास ज्यूनियर टीम इंडिया सज्ज

दरम्यान, आता वनडे वर्ल्डकप फायनलच्या ८४ दिवसांनंतर ऑस्ट्रेलियाकडून बदला घेण्यीच संधी आली आहे. उदय सहारनची अंडर-१९ टीम इंडिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 

भारताला विश्वविजेता बनवण्यासाठी प्रत्येक खेळाडू आपले सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. या विश्वचषकात ज्युनियर भारतीय संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. अशा परिस्थितीत WTC फायनल आणि वनडे वर्ल्डकप फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याची ही सुवर्ण संधी आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया अंडर १९ वर्ल्डकप फायनल कधी होणार आहे?

भारत-ऑस्ट्रेलिया अंडर १९ वर्ल्डकप फायनल रविवारी (११ फेब्रुवारी) होणार आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया अंडर १९ वर्ल्डकप फायनल किती वाजता सुरू होणार आहे?

भारत-ऑस्ट्रेलिया अंडर १ ९ वर्ल्डकप फायनल भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल.

भारत-ऑस्ट्रेलिया अंडर १९ वर्ल्डकप फायनल कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?

भारत-ऑस्ट्रेलिया अंडर १९ वर्ल्डकप फायनल स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाइव्ह पाहता येईल.

भारत-ऑस्ट्रेलिया अंडर १९ वर्ल्डकप फायनलचे लाइव्ह स्ट्रिमिंग कोणत्या अॅपवर पाहता येईल?

भारत-ऑस्ट्रेलिया अंडर १९ वर्ल्डकप फायनलचे लाइव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर (hotstar app) वर पाहता येणार आहे.

WhatsApp channel