IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; अश्विनचे पुनरागमन
India vs Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.
India vs Australia ODI Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या २२ सप्टेंबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली. या दोन सामन्यात केएल राहुल भारतीय संघाची धुरा संभाळणार आहे. या मालिकेत आर अश्विनचे संघात पुनरागमन झाले. मात्र, तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या संघात परतणार आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या तोंडावर बीसीसीआयने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. यासोबतच विश्वचषकासाठी भारतीय संघामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे निवडकर्त्यांना बदलीचा विचार करावा लागणार आहे. आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. यामुळे आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदरला तिन्ही एकदिवसीय संघात ठेवण्यात आले. एकदिवसीय विश्वचषकात दोघांपैकी एकाला तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय, पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी निवड समितीने रुतुराज गायकवाड तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा देखील संघात स्थान दिले आहे. मात्र, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून या तिघांना वगळण्यात आले आहे. मात्र, संजू सॅमसनची एकाही सामन्यात निवड झालेली नाही. ज्यामुळे संजू सॅमसनच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
भारत- ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना: २२ सप्टेंबर २०२३
दुसरा एकदिवसीय सामना: २४ सप्टेंबर २०२३
तिसरा एकदिवसीय सामना: २७ सप्टेंबर २०२३
पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ:
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, आर अश्विन, वॉशिंगटन सुंदर.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकुर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, आर अश्विन, वॉशिंगटन सुंदर.
विभाग