IND vs AUS: गुरुवारपासून भारत- ऑस्ट्रेलियात टी-२० मालिका रंगणार, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
IND vs AUS T20 Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे.
India vs Australia: एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेला येत्या २३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. भारताचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही.या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू वेड संघाचे नेतृत्त्व करणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, भारताचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड किंवा सूर्यकुमार यादव यांच्या खांद्यावर संघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह संघातील अनेक वरिष्ठ खेळाडू विश्रांती दिली जाऊ शकते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या युवा खेळाडूंचा संघ जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंह, तिलक वर्मा आणि रियान पराग या फलंदाजांना भारतीय संघात संधी मिळू शकते. तर, संजू सॅमसन यष्टिरक्षक म्हणून परत येऊ शकतो. याशिवाय, जितेश शर्माची बॅकअप यष्टीरक्षक म्हणून संघात निवड केली जाऊ शकते. मुकेश कुमार, अर्शदीप सिंह आणि रवी बिश्नोई हे गोलंदाजांची युनिट संभाळताना दिसू शकतात.
ऑस्ट्रेलियाचा संघ
मॅथ्यू वेड (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, जोश इंग्लिस, तन्वीर संघा, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झाम्पा.
भारताचा संभाव्य संघ
सूर्यकुमार यादव, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवी बिश्नोई, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, टिळक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, रिंकू सिंग, रायन पराग, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल , मुकेश कुमार.
विभाग