मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mitchell Marsh : मिचेल मार्श वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवून बसला, भारतीय क्रिकेटप्रेमी संतापले!

Mitchell Marsh : मिचेल मार्श वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवून बसला, भारतीय क्रिकेटप्रेमी संतापले!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Nov 20, 2023 03:13 PM IST

Mitchell Marsh World Cup Trophy : ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर मिचेल मार्श वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवून बसला आहे. त्यामुळे भारतीय लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.

Mitchell Marsh World Cup Trophy
Mitchell Marsh World Cup Trophy

क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आणि सहाव्यांदा वर्ल्डकप ट्रॉफी जिंकली. यानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श प्रतिष्ठित विश्वचषक ट्रॉफीचा कथित अनादर करताना दिसला.

ट्रेंडिंग न्यूज

सोशल मीडियावर एक फोटो खूप वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोत मिचेल मार्श वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवून बसलेला दिसत आहे. मार्शने वर्ल्डकप फायनलमध्ये १५ धावा केल्या. त्याला बुमराहने केएल राहुलच्या हाती झेलबाद केले.

मात्र, मार्श ट्रॉफीवर पाय ठेवून बसल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या भावना दुखावल्या आहेत. भारतीय क्रिकेट चाहते त्यावर जोरदार टीका करत आहेत.

विशेष म्हणजे, मार्श २०१५ च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचाही भाग होता. मार्शच्या अशा वागणुकीमुळे सोशल मीडियावरील चाहते त्याच्यावर टीका करत आहेत.

 

 

वर्ल्डकप फायनलमध्ये काय घडलं?

वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. यानंतर त्यांनी भारताला २४० धावांत गुंडाळले आणि ४३ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.

ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने १३७ धावांची सामना जिंकवणारी खेळी खेळली. त्याने १२० चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकार मारले. तर मार्नस लॅब्युशेनने ११० चेंडूत ५८ धावांची समजंस खेळी खेळली.

भारताने सुरुवात चांगली केली पण त्यानंतर नियमित अंतराने विकेट्स पडत राहिल्या. त्यामुळे फलंदाजांवर दबाव वाढला आणि संपूर्ण संघ केवळ २४० धावाच करू शकला. भारताकडून, केएल राहुलने १०७ चेंडूत सर्वाधिक ६६ धावांची संथ खेळी तर विराट कोहलीने ६३ चेंडूत ५४ धावांची खेळी खेळली. रोहित शर्माने झटपट ४७ धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.

रोहित, कोहली आणि राहुलला चांगल्या सुरुवातीचे रुपांतर मोठ्या डावात करता आले नाही. श्रेयस अय्यर, शुभमन गिल, सूर्यकुमार मोक्याच्या क्षणी अपयशी ठरले.

WhatsApp channel
Cricket News मधील सर्व ताज्या घडामोडी Live Score सह Marathi News आणि प्रत्येक सामन्यागणिक बदलणारा पाहा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर