IND vs AUS Dream 11 Prediction : टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये आज सोमवारी (२४ जून) भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. सुपर ८ फेरीचा हा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडिमयवर खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरूवात होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या सामन्यानंतर कोणता संघ उपांत्य फेरीत पोहोचणार आणि कोणाला आणखी संघर्ष करावा लागणार याबाबत बरेच काही स्पष्ट होणार आहे. अशा स्थितीत हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा असून चाहत्यांना हाय व्होल्टेजचा सामना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, भारत असो की ऑस्ट्रेलिया, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याची आतापर्यंतची कामगिरी चांगली आहे. बांगलादेशसोबत खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात हार्दिक पंड्याने अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने आधी अर्धशतक केले आणि नंतर १ बळीही घेतला. त्यासाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.
आता ऑस्ट्रेलियाविरुद्धही हार्दिककडून खूप अपेक्षा असतील. तो फॉर्मात आहे. याशिवाय उपकर्णधार म्हणून तुम्ही ऑस्ट्रेलियन स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सची निवड करू शकता. कमिन्सने सलग दोन सामन्यात हॅट्ट्रिक घेतली आहे.
कर्णधार : हार्दिक पंड्या
उपकर्णधार: पॅट कमिन्स
यष्टिरक्षक : ऋषभ पंत
फलंदाज: डेव्हिड वॉर्नर, सूर्यकुमार यादव, ट्रॅव्हिस हेड
अष्टपैलू: मार्कस स्टॉइनिस, अक्षर पटेल
गोलंदाज: ॲडम झाम्पा, जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झम्पा, जोश हेझलवूड.
संबंधित बातम्या