IND vs AUS 2nd Test Highlights : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४ चा दुसरा सामना ॲडलेड ओव्हल येथे खेळला गेला. या सामन्यात यजमान संघ विजयी झाला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १९ धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी सहज गाठले.
या सामन्यात भारतीय संघाला १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १९ धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी सहज गाठले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. कसोटी मालिकेतील तिसरा सामना १४ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे.
या पिंक बॉल कसोटीत भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पण संपूर्ण संघ पहिल्या डावात केवळ १८० धावांत गारद झाला. तर यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात ३३७ धावांत सर्वबाद झाला होता. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावाच्या आधारे १५७ धावांची आघाडी मिळाली. भारतीय संघाला महागात पडली.
कमिन्सचे ५ विकेट्स - भारतीय संघाची दुसऱ्या डावात चांगली सुरुवात झाली नाही आणि १२ धावांच्या स्कोअरवर केएल राहुलची (७) विकेट गमावली. पॅट कमिन्सने राहुलला यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीकडे झेलबाद केले. यानंतर यशस्वी जैस्वालही स्कॉट बोलंडच्या चेंडूवर २४ धावा करून बाद झाला.
विराट कोहलीही काही विशेष करू शकला नाही आणि बोलंडच्या चेंडूवर विकेटकीपर कॅरीकडे झेलबाद झाला. कोहलीने २१ चेंडूंचा सामना करत ११ धावा केल्या.
शुभमन गिलकडून (२८) चांगल्या खेळीची अपेक्षा होती, पण मिचेल स्टार्कने त्याचा मधला यष्टी उडवला. यानंतर कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा निराशा केली, तो पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. रोहितने ६ धावा केल्या. येथून ऋषभ पंत आणि नितीश रेड्डी यांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाला आणखी तोटा होऊ दिला नाही.
यानंतर आज (८ डिसेंबर) तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला पहिल्याच षटकात ऋषभ पंतच्या रुपाने मोठा धक्का बसला. पंतला मिचेल स्टार्कने पहिल्या स्लिपमध्ये स्टीव्ह स्मिथच्या हाती झेलबाद केले. पंतने ३१ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या. यानंतर पॅट कमिन्सने भारताला दोन मोठे धक्के दिले. त्यांनी प्रथम आर. अश्विन (७) विकेटच्या मागे झेलबाद झाला. त्यानंतर हर्षित राणा (०)ही स्वस्तात बाद झाला.
नितीश रेड्डी याने काही तुफानी फटके नक्कीच मारले, पण तोही कमिन्सचा बळी ठरला. नितीशने दुसऱ्या डावात भारतासाठी सर्वाधिक ४२ धावा केल्या, ज्यात ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. मोहम्मद सिराज (७) बाद होणारा शेवटचा फलंदाज होता, त्याला स्कॉट बोलंडने बाद केले.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक ५ बळी घेतले. तर स्कॉट बोलँडने ३ विकेट घेतले. तर मिचेल स्टार्कने दोन विकेट घेतल्या.
संबंधित बातम्या