बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) २०२४-२५ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरी कसोटी ब्रिस्बेनमधील गाबा येथे सुरू आहे. आज (१६ डिसेंबर) गाबा कसोटीचा तिसरा दिवस असून ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या.
प्रत्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात अतिशय वाईट झाली आहे. लंचपर्यंत भारताची धावसंख्या २२ धावा असून त्यांच्या ३ विकेट पडल्या आहेत. केएल राहुल मैदानात आहे. भारत आणखी ४२३ धावांनी पिछाडीवर आहे.
आज तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने सात विकेट्सवर ४०५ धावांच्या पुढे आपला डाव सुरू केला. मात्र लवकरच त्यांना आठवा धक्का बसला. मिचेल स्टार्क (१८ धावा) जसप्रीत बुमराहने यष्टिरक्षक पंतच्या हाती झेलबाद झाला.
त्यानंतर नॅथन लायन (२ धावा) सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर ॲलेक्स कॅरीला आकाश दीपने बाद केले. कॅरीने ८८ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांसह ७० धावा केल्या. भारताकडून बुमराहने सर्वाधिक ६ विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात भारतीय संघाची पहिली सुरुवात खूपच खराब झाली. कारण दुसऱ्याच चेंडूवर त्याने यशस्वी जैस्वालची विकेट गमावली. डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या चेंडूवर फ्लिक शॉट खेळण्याच्या प्रयत्नात यशस्वी मिचेल मार्शच्या हाती झेलबाद झाला.
त्यानंतर स्टार्कने त्याच्या पुढच्याच षटकात शुभमन गिललाही (१ धावा) बाद केले. मार्शनेच गिलचाही झेल घेतला. दोन विकेट लवकर पडल्यानंतर अनुभवी विराट कोहलीकडून चांगल्या खेळाच्या अपेक्षा होत्या, मात्र जोश हेझलवूडच्या चेंडूवर तो यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीकरवी झेलबाद झाला. कोहलीने १६ चेंडूंचा सामना करत ३ धावा केल्या.
ऑस्ट्रेलिया- उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड.
भारत- यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप
संबंधित बातम्या