Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाचा 'गॅरी सोबर्स', वयाच्या ३० वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाचा 'गॅरी सोबर्स', वयाच्या ३० वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार, पाहा

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाचा 'गॅरी सोबर्स', वयाच्या ३० वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार, पाहा

Nov 29, 2024 10:13 PM IST

IND vs AUS Adelaide Test Beau Webster Debut : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला असून, या सामन्यासाठी ३० वर्षीय अष्टपैलू खेळाडू कसोटी पदार्पण करणार आहे.

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाचा 'गॅरी सोबर्स', वयाच्या ३० वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार, पाहा
Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाचा 'गॅरी सोबर्स', वयाच्या ३० वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार, पाहा (AFP)

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया जोरदार तयारी करत आहेत. दोन्ही संघामधील दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबर ते १० डिसेंबर दरम्यान ॲडलेड ओव्हल येथे खेळवला जाईल. हा दिवस-रात्र कसोटी सामना असून गुलाबी चेंडूने खेळला जाईल. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने ॲडलेड कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे.

यामध्ये एक नाव पाहून सगळेजण त्याला गुगलवर सर्च करत आहेत. ते नाव आहे ब्यू वेबस्टर याचे, ब्यु वेबस्टर याला मिचेल मार्शच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. पर्थ कसोटीदरम्यान मार्शला दुखापत झाली होती.

३० वर्षीय ब्यू वेबस्टरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या शानदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचा अलीकडचा फॉर्म आणि अष्टपैलू खेळ लक्षात घेऊन त्याची निवड करण्यात आली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या मार्गावर असलेला वेबस्टर ऑस्ट्रेलियासाठी मोलाचा पर्याय ठरू शकतो.

ब्यू वेबस्टरने गेल्या वर्षी शेफिल्ड शिल्डमध्ये अनोखा विक्रम केला होता. कसोटी क्रिकेटच्या १३२ वर्षांच्या इतिहासात केवळ वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू खेळाडू गारफिल्ड सोबर्स हेच असा विक्रम साध्य करू शकले होते. वास्तविक, वेबस्टरने एका मोसमात ९०० हून अधिक धावा केल्या आणि ३० बळी घेतले. या कामगिरीमुळे तो देशांतर्गत क्रिकेटमधील अव्वल खेळाडू ठरला.

ब्यू वेबस्टर या मोसमातही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत त्याने ५६ च्या सरासरीने ४४८ धावा केल्या असून १६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या गोलंदाजीतील वैविध्य हे वेबस्टरचे वैशिष्ट्य आहे. त्याने ४ वर्षांपूर्वी त्याच्या स्कील्समध्ये सीम बॉलिंगची भर घातली आणि ऑफ स्पिन देखील केली. ही अष्टपैलू क्षमता त्याला मधल्या फळीत उपयुक्त खेळाडू बनवते.

ब्यू वेबस्टरने ९३प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या ९३ सामन्यांमध्ये त्याने ३७.८३ च्या सरासरीने ५२९७ धावा केल्या आहेत. यामध्ये २४ अर्धशतकांचा समावेश आहे. वेबस्टरने ९३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३.४५ च्या इकॉनॉमीने १४८ विकेट घेतल्या आहेत.

Whats_app_banner