भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील शेवटची कसोटी आज (३ जानेवारी) सिडनीत खेळलीत जात आहे. या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत आहे. पण या कसोटीतही भारतीय फलंदाज फ्लॉप होताना दिसत आहेत.
सिडनी कसोटीत लंचपर्यंत भारताने ३ विकेट गमावून ५७ धावा केल्या आहेत. आतापर्यंत केएल राहुल, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी आपापल्या विकेट्स गमावल्या आहेत. सध्या विराट कोहली १२ धावा करून खेळत आहे. लंचपूर्वीच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर शुभमन गिलने २० धावांवर आपली विकेट गमावली. तर विराट कोहली क्रीजवर आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारतीय संघाला पहिला धक्का केएल राहुलच्या (४) रूपाने बसला, तो मिचेल स्टार्कच्या चेंडूवर सॅम कॉन्स्टासकरवी स्क्वेअर लेगवर झेलबाद झाला. त्यानंतर दुसरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल (१०) देखील स्कॉट बोलंडचा चेंडू तिसऱ्या स्लिपमध्ये खेळला.
यानंतर शुभमन गिलने (२०) कोहलीसह विकेटवर धाडसाने खेळ केला, पण लंचपूर्वी नॅथन लायनचा चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न केला,पण चेंडू स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथच्या हातात गेला. लंचच्या आधी या शॉटची अजिबात गरज नव्हती. गिल आणि कोहली यांच्यात ४० धावांची भागिदारी झाली.
ऑस्ट्रेलिया- सॅम कोन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड
भारत- यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज.
संबंधित बातम्या