ND vs AUS : मेलबर्नची पीच कशी असेल? भारत दोन फिरकीपटूंना खेळवणार? संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  ND vs AUS : मेलबर्नची पीच कशी असेल? भारत दोन फिरकीपटूंना खेळवणार? संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या

ND vs AUS : मेलबर्नची पीच कशी असेल? भारत दोन फिरकीपटूंना खेळवणार? संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या

Dec 25, 2024 09:12 PM IST

IND vs AUS 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याशी संबंधित A ते Z माहिती येथे जाणून घ्या.

ND vs AUS : मेलबर्नची पीच कशी असेल? भारत दोन फिरकीपटूंना खेळवणार? संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या
ND vs AUS : मेलबर्नची पीच कशी असेल? भारत दोन फिरकीपटूंना खेळवणार? संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या (AFP)

India vs Australia Boxing Day Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून गुरुवार (२६ डिसेंबर) बॉक्सिंग डे कसोटी खेळली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ ची ही चौथी कसोटी आहे. आतापर्यंत ५ सामन्यांची ही कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. डब्ल्यूटीसी फायनलच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी उर्वरित दोन सामने जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे होणार आहे. हा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार पहाटे ५ वाजता सुरू होईल. हा सामना तुम्ही टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि मोबाइलवरील हॉटस्टार ॲपवर पाहू शकाल.

भारतीय संघ काही बदलांसह या कसोटी सामन्यात उतरू शकतो. कर्णधार रोहित शर्मा डावाची सुरुवात करताना दिसणार आहे. आतापर्यंत हिटमॅन दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत मधल्या फळीत खेळला होता. शुभमन गिल संघाबाहेर राहू शकतो. गिलच्या जागी केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर खेळेल अशी अपेक्षा आहे.

यानंतर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे. ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. या मालिकेत पंतला आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. आयसीसी कसोटी क्रमवारीतही तो टॉप-१० मधून बाहेर पडला आहे.

त्यानंतर सहाव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा, सातव्या क्रमांकावर नितीशकुमार रेड्डी आणि आठव्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदर खेळू शकतात.

मेलबर्नची खेळपट्टी पाहता टीम इंडिया दोन फिरकीपटूंसोबत जाऊ शकते. नितीश आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहेत. अशा स्थितीत तो फलंदाज म्हणून शेवटच्या अकरामध्ये स्थान मिळवू शकतो. वेगवान गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप हे त्रिकूट पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसणार आहे.

मेलबर्नची खेळपट्टी फिरकीपटूंना खूप मदत करते. या कारणास्तव टीम इंडिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांचा समावेश करू शकते. तसेच, येथे धावा काढणे देखील सोपे आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने आपले प्लेइंग इलेव्हन जाहीर केले आहे. कांगारूंनी १९ वर्षीय सॅम कोन्स्टासचा अंतिम अकरामध्ये समावेश केला आहे. नॅथन मॅकस्विनीच्या जागी त्याला संधी मिळाली आहे. याशिवाय दुखापतग्रस्त जोश हेजलवूडच्या जागी स्कॉट बोलंड संघात आला आहे.

चौथ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन - उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टॅन्स, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, नॅथन लियॉन, मिचेल स्टार्क आणि स्कॉट बोलँड.

चौथ्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

Whats_app_banner